Mukesh Ambani : रिलायन्सचा जगात डंका! Fortune Global कंपन्यांच्या यादीत असे पटकावले स्थान
Mukesh Ambani : गेल्या दोनच वर्षांत रिलायन्स मोठी घौडदोड केली. त्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. मुकेश अंबानी यांचा डंका वाजला. फॉर्च्युन ग्लोबल यादीत रिलायन्सने मोठी झेप घेतली.
नवी दिल्ली | 03 ऑगस्ट 2023 : आशियातील सर्वात मोठे श्रीमंत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नावाचा पुन्हा एकदा डंका वाजला. रिलायन्स इंडस्ट्रीजचा जागतिक पातळीवर बहुमान झाला. जगभरातील मोठ्या कंपन्यामध्ये रिलायन्स (Reliance Industries Ltd) चमकली. फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीत (Fortune Global 500) रिलायन्सने मोठी उसळी घेतली. या 500 कंपन्यांच्या या यादीत बोटावर मोजण्याइतक्या भारतीय कंपन्यांची नावे आहेत. त्यात रिलायन्स टॉप-100 मध्ये कंपनीने मोठी आघाडी घेतली आहे. 2021 मध्ये या यादीत रिलायन्स 155 व्या क्रमांकावर होती. गेल्या वर्षी कंपनी या यादीत 104 या क्रमांकावर होती. आता कंपनीने नवीन रेकॉर्ड केला आहे. असा बहुमान मिळवणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. इतर कंपन्या या यादीत आहे. पण त्यांना टॉप-100 मध्ये स्थान मिळवता आले नाही.
दोन वर्षांत अशी घेतली आघाडी
पीटीआयच्या वृत्तानुसार, फॉर्च्युन ग्लोबल यादीत मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या दोन वर्षांत रॉकेट भरारी घेतली. या कालावधीत कंपनीने रँकिंगमध्ये मोठी सुधारणा केली. 67 कंपन्यांना मागे फेकत, कंपनीने आगेकूच केली. 2021 साली कंपनी 155 व्या क्रमांकावर होती. फॉर्च्युन ग्लोबल 500 यादी दरवर्षी प्रसिद्ध होते. अनेक मानकांआधारे कंपनीची घौडदोड तपासण्यात येते.
रिलायन्सचा महसूल वाढला
रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वाधिक मुल्यांकन असलेली कंपनी आहे. या कंपनीचे बाजारातील भागभांडवल 16.83 लाख कोटी कोटी रुपये आहे. रिलायन्सचा एकूण महसूल 23.2 टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये महसूलाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. तो 9,76,524 कोटी रुपयांवर पोहचला.
श्रीमंतीत पण सर्वात पुढे
मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. तर जगातील अब्जाधीशांच्या यादीत ते सध्या 11 व्या स्थानावर आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण नेटवर्थ 94.5 अब्ज डॉलर इतकी आहे.
इतर कंपन्या कोणत्या
Fortune Global 500 List मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजसह इतर 8 कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, एलआयसी, ओएनजीसी, एसबीआयसह इतर कंपन्यांचा समावेश आहे. रिलायन्ससारखीच इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने मोठी झेप घेतली आहे. ही सरकारी कंपनी या यादीत 94 व्या क्रमांकावर आहे. एलआयसी या यादीत 107 व्या क्रमांकावर आहे.
जिओ फायनेन्शिअलची कमाल
जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडने (JFSL ) आल्या आल्या मैदान मारले. त्यामुळे दिग्गज कंपन्यांना धडकी भरली आहे. ही कंपनी भारतीय वित्तीय क्षेत्रात मोठा उलटफेर करु शकते, अशी भीती स्पर्धक कंपन्यांना सतावत आहे. रिलायन्समधून ही कंपनी स्वतंत्र झाली. जेएफएसएलचे बाजारातील मूल्य 20 अब्ज डॉलरहून अधिक आहे. त्यामुळे JFSL आता गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील कंपन्या कोल इंडिया आणि इंडियन ऑईलपेक्षा पुढे आहे. तर रतन टाटा यांची टाटा स्टील पण मागे आहे. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेजच्या शेअरची किंमत 20 जुलै रोजी निश्चित झाली. ही किंमत एनएसईवर 261.85 रुपये प्रति शेअरवर किंमत निश्चित झाली. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना फटक्यात लॉटरी लागली.