Ambani Overtakes Adani : श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! अंबानी यांनी अदानी यांना टाकले की मागे
Ambani Overtakes Adani : श्रीमंतांच्या यादीत मोठा फेरबदल झाला. अंबानी यांनी टाकले अदानी यांना मागे
नवी दिल्ली : देशात केंद्रीय अर्थसंकल्पाची (Union Budget 2023) धामधूम सुरु असतानाच जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत (Richest List) मोठा उलटफेर झाला. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी गौतम अदानी यांना पिछाडीवर टाकले आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहात धुमाकूळ सुरु आहे. एकाच महिन्यात अदानी यांची अब्जावधींची संपत्ती कमी झाली आहे. गेल्या महिन्यात ते तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते. हिंडनबर्गच्या वादाळानंतर ते टॉप-10 च्या यादीतूनच गायब होतात की आहे, अशी परिस्थिती आहे. आता या यादीत अंबानी यांनी बाजी मारली आहे. तर अदानी (Gautam Adani) त्यांच्यापेक्षा पिछाडीवर आहेत.
अंबानी यांनी त्यांच्या 84.3 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह गौतम अदानी यांना पिछाडीवर टाकलं आहे. फोर्ब्सने ही यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, या यादीत अदानी हे 10 व्या क्रमांकावर होते. तर अंबानी यांचा क्रमांक 9 होता. 24 तासांत अदानी यांना 10 अब्ज डॉलरचा फटका बसल्याने ते यादीत चौथ्या क्रमांकाहून थेट आठव्या स्थानी फेकले गेले होते.
एकाच दिवसात सर्वाधिक संपत्ती गमाविण्याचा विक्रमही अदानी यांच्या नावे आहे. एकाच दिवशी 20.8 अब्ज डॉलर गमावल्यानंतर अदानी हे एलॉन मस्क, जेफ बेजोस आणि मार्क झुकरबर्ग यांच्या रांगेत येऊन बसले. यासर्वांची एका दिवसात मोठी संपत्ती घटली होती.
एलॉन मस्कने एका दिवसात सर्वाधिक 35 अब्ज डॉलर, मार्क झुकरबर्गने 31 अब्ज डॉलर तर जेफ बेजोस यांनी 20.5 अब्ज डॉलर गमावले आहेत. आता 20.8 अब्ज डॉलर गमावल्यानंतर अदानी त्यांच्या रांगेत जाऊन बसले. हे वादळ शमले नाहीतर या यादीतून कदाचित ते बाहेर होतील.
जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर 214 अब्ज डॉलर संपत्तीसह बर्नार्ड अर्नाल्ट आघाडीवर आहेत. दुसऱ्या स्थानी एलॉन मस्क आहे. त्यांची एकूण संपत्ती 178.3 अब्ज डॉलर आहे. तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेजोस आहे. त्यांची एकूण संपत्ती 126.3 अब्ज डॉलर आहे.
111.9 अब्ज डॉलरसह लॅरी एलिसन चौथ्या क्रमांकावर आहेत. 108.5 अब्ज डॉलर संपत्तीसह वॉरेन बफे पाचव्या, 104.5 अब्ज डॉलरसह बिल गेट्स सहाव्या स्थानावर आहेत. श्रीमंतांच्या यादीत सातव्या क्रमांकावर कार्लोस स्लिम हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 91.7 अब्ज डॉलर आहे.
फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत आठव्या क्रमांकावर लॅरी पेज हे आहेत. त्यांची एकूण संपत्ती 85.8 अब्ज डॉलर आहे. त्यांच्यानंतर अंबानी यांचा क्रमांक लागतो. आता या टॉप-10 च्या यादीत सर्वात शेवटी अंबानी हे आहेत.