Mukesh Ambani : रिलायन्स आता वाटणार गोडवा! या चॉकलेट कंपनीचा 7/12 नावावर

Mukesh Ambani : 'in the business of pure joy' तर अशा शुद्ध आनंद देणाऱ्या व्यवसायात रिलायन्सने दमदार एंट्री घेतली आहे. चॉकलेट व्यवसायातील ही मोठी कंपनी आता रिलायन्सच्या मालकीची झाली आहे.

Mukesh Ambani : रिलायन्स आता वाटणार गोडवा! या चॉकलेट कंपनीचा 7/12 नावावर
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 10:00 AM

नवी दिल्ली : ‘in the business of pure joy’ अशी टॅगलाईन अभिमानाने मिरवणारी चॉकलेट कंपनी आता रिलायन्सच्या मालकीची झाली आहे. भारतातील जुनी चॉकलेट कंपनीत आता रिलायन्सची मोठी भागीदारी झाली. आता मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल (Reliance Retail) भारतात गोडवा वाटणार आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) त्यांच्या व्यवसायाचा सातत्याने विस्तार करत आहेत. गेल्या एका वर्षात या समूहाने अनेक कंपन्या, ब्रँड पंखाखाली घेतले आहे. शीतपेयापासून ते रिटेल व्यवसायतील अनेक दिग्गज कंपन्या आता रिलायन्सच्या मालकीच्या झाल्या आहेत. त्यात या चॉकलेट कंपनीची (Chocolate Company) भर पडली आहे.

या कंपनीत 51 टक्के वाटा Lotus Chocolate आपण कधीतरी खाल्लचं असेल. ही चॉकलेट कंपनी 1988 साली स्थापन झाली होती. ही कंपनी कोका आणि चॉकलेट उत्पादनांचा पुरवठा करते. रिलायन्स आणि लोटस यांच्या अधिग्रहणाची घोषणा 29 डिसेंबर, 2022 रोजी झाली होती. रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (Reliance Consumer Products Limited) या कंपनीने 51 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आणि अधिग्रहण पूर्ण झाले.

इतक्या कोटींची डील रिपोर्टनुसार, रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड (Lotus Chocolate Company Limited) मध्ये मोठी हिस्सेदारी खरेदी केली. 74 कोटी रुपयांमध्ये हे अधिग्रहण पूर्ण झाले. 25 कोटी रुपये देऊन कंपनीचे अधिग्रहण करण्यात आले. या 24 मे पासून या कंपनीची कमान रिलायन्सने संभाळल्याची माहिती देण्यात आली. खुल्या ऑफर अंतर्गत शेअरचे अधिग्रहण करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

सहायक कंपनीने केली घोषणा रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड ही रिलायन्सची सहायक कंपनी आहे. ही कंपनी सर्व किरकोळ व्यवसायावर नियंत्रण ठेवते. रिलायन्स आणि लोटस यांच्या अधिग्रहणाची घोषणा 29 डिसेंबर, 2022 रोजी झाली होती. रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (Reliance Consumer Products Limited) या कंपनीने 51 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आणि अधिग्रहण पूर्ण झाले. बाजार नियंत्रक सेबीने (SEBI) लोटस इक्विटी शेअर निधीचा अतिरिक्त 26 टक्के हिस्सा खरेदीची सार्वजनिक घोषणा केली होती.

अशी झाली सुरुवात Lotus Chocolate ही चॉकलेट कंपनी 1988 साली स्थापन झाली होती. ही कंपनी कोका आणि चॉकलेट उत्पादनांचा पुरवठा करते. डिसेंबरमध्ये कराराची प्रक्रिया सुरु असताना खरेदीसाठी शेअरचा भाव 113 रुपये प्रति शेअर असा ठरला होता. हा करार झाल्यानंतर या कंपनीचा शेअर गुरुवारी 1.82 टक्क्यांनी उसळला. शुक्रवारी, 26 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या जवळपास या शेअरचा भाव 152.40 रुपये प्रति शेअर होता.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.