Mukesh Ambani : रिलायन्सचा पसारा वाढाला, UK मधील हा फॅशन ब्रँड ताब्यात

Mukesh Ambani : रिलायन्सचा पसारा प्रचंड वाढला आहे. अनेक जागतिक कंपन्या, देशी कंपन्या या समूहात दाखल झाल्या आहेत. काही कंपन्यांनी आघाडी खेली आहे. तर काही कंपन्या थेट खरेदी करण्यात आल्या आहेत. आता इंग्लंडमधील हा प्रसिद्ध ब्रँड रिलायन्स रिटेलमध्ये दाखल होत आहे. त्यामुळे व्यवसाय वृद्धीचे गणित जमवता येईल.

Mukesh Ambani : रिलायन्सचा पसारा वाढाला, UK मधील हा फॅशन ब्रँड ताब्यात
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 6:30 PM

नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : रिलायन्स (Reliance Group) हा आता जागतिक ब्रँड झाला आहे. अनेक जागतिक आणि देशी कंपन्यांची रीघ या समूहाकडे लागली आहे. महिन्याआड या समूहाकडून कंपनी खरेदीची वार्ता येऊन धडकत आहे. परदेशातील अनेक ब्रँड रिलायन्सच्या ताफ्यात जोडल्या जात आहे. तर देशातील अनेक नवे-जुने ब्रँड रिलायन्स समूहात दाखल झाले आहेत. रिलायन्सची ही यादी वाढतच जात आहे. रिलायन्सने सध्या कंपन्या खरेदीचा सपाटाच लावला आहे. आता ब्रिटनमधील हा प्रसिद्ध ब्रँड रिलायन्समध्ये दाखल होत आहे. त्यासाठीचा करार ठरला आहे. त्यामुळे परदेशात पण रिलायन्सचा दबदबा वाढला आहे.

Fashion ब्रँड झाला दाखल

इंग्लंडमध्ये सध्या महागाई आणि मंदीने अनेक व्यवसायांना आणि कंपन्याना घरघर लागली आहे. इंग्लंडमधील फॅशन रिटेल ब्रँड सुपरड्राय (Superdry) रिलायन्सच्या ताफ्यात दाखल होत आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलमध्ये ही कंपनी येत आहे. सुपरड्राय ही त्यांची मालमत्ता 48.27 दशलक्ष डॉलरवर विक्री करत आहे. जागतिक वृत्तसंस्था रॉयटर्सने ही माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

18,000 स्टोअरचा पसारा

सुपरड्राय आणि रिलायन्स रिटेल यांच्याकडे एकूण 18,000 स्टोअरचा पसारा आहे. यामध्ये सुपरड्रायचा हिस्सा 24% तर रिलायन्सचा शेअर 76% आहे. या वृत्तानुसार कंपनी श्रीलंका, बांगलादेशसह इतर देशात तिथल्या ब्रँडसोबत संयुक्त उपक्रमाचा कार्यक्रम सुरुच ठेवणार आहे. यातंर्गत इतर ब्रँड रिलायन्समध्ये दाखल होऊ शकतात.

आलिया भटची कंपनी केली होती खरेदी

रिलायन्स रिटेल हा भारतातील सर्वात मोठा ब्रँड आहे. कंपनीने आलिया भट हिच्या लहान मुलांसाठीच्या फॅशन ब्रँडमध्ये 51 टक्क्यांची खरेदी केली आहे. Ed-a-Mamma हा ब्रँड सप्टेंबर महिन्यात रिलायन्स रिटेलमध्ये दाखल झाला. 2007 मध्ये Reliance Brands स्थापन झाला. या कंपनीने 50 जागतिक ब्रँडसोबत करार केला आहे. कंपनीचे देशात 2,000 हून अधिक स्टोअर आहेत. रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेडचा टर्नओव्हर 2.60 लाख कोटी रुपयांच्या घरात आहे.

कॅम्पा कोला रिलाँच

रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्टस लिमिटेडने (Reliance Consumer Products Limited) 50 वर्षांपूर्वीच्या कोल्ड ड्रिंक ब्रँड कॅम्पा कोला रिलाँच केला आहे. कँम्पा हे नाव जुन्या पिढीच्या ओठांवर आजही आहे आणि त्याची चव ही अनेकांना आठवत असेल . प्युअर ड्रिंक्स समूहाकडून (Pure Drinks Group) रिलायन्सने 22 कोटी रुपयांत हा ब्रँड खरेदी केला आहे. सध्या कँम्पा तीन फ्लेवरमध्ये येत आहे. त्यात कँम्पा कोला, कँम्पा लेमन आणि कँम्पा ऑरेंज यांचा समावेश आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.