Mukesh Ambani | डील झाली तर तुम्हाला लॉटरी पक्की! मुकेश अंबानी या कंपनीचे नशीब पालटणार

Mukesh Ambani | जर सर्व व्यवस्थित झालं तर लवकरच ही कंपनी रिलायन्सच्या ताफ्यत येऊ शकते. यापूर्वी पण हा समूह ताब्यात घेण्यासाठी रिलायन्सने खुप प्रयत्न केले. पण ते शक्य झाले नाही. ही कंपनी दिवाळखोरीत गेल्यापासून राष्ट्रीय कंपनी न्याायधीकरणाच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. आता अशी अपडेट समोर येत आहे.

Mukesh Ambani | डील झाली तर तुम्हाला लॉटरी पक्की! मुकेश अंबानी या कंपनीचे नशीब पालटणार
रिलायन्समुळे छप्परफाड कमाई
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 4:08 PM

नवी दिल्ली | 2 March 2024 : लवकरच ही कंपनी रिलायन्सच्या ताफ्यात येऊ शकते. गेल्या तीन ते चार वर्षात रिलायन्सचा पसारा विस्तारत चालला आहे. सातत्याने नवनवीन कंपन्या, अनेक ब्रँड्स या समूहात येत आहे. मुलीच्या नावे रिटेल व्हेंचर केल्यापासून अनेक देशी आणि जागतिक ब्रँड दाखल झाले आहेत. आता फ्युचर सप्लाई चेन सोल्यूशन्स पण रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये सामावून घेण्याची पुन्हा संधी आली आहे. यापूर्वी पण हा समूह ताब्यात घेण्यासाठी रिलायन्सने जोमाने खेळी खेळली होती.

NCLT कडून दिलासा

फ्युचर समूहाची कंपनी फ्युचर सप्लाई चेन सोल्यूशन्स लवकरच रिलायन्स समूहात येऊ शकते. ही कंपनी किशोर बियाणी यांची आहे. या समूहाने खुप सुवर्णकाळ अनुभवला आहे. पण नंतर हा समूह दिवाळखोरीत गेला. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी बोली लावण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी कंपनीला राष्ट्रीय कंपनी न्यायाधीकरणाने 45 दिवसांचा वेळ दिला आहे. याशिवाय लोन इंडिया ही कंपनी पण या शर्यतीत अग्रेसर आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनी ताब्यात घेण्यासाठी यांच्यात चुरस

कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. कंपनीसाठी अधिकाधिक बोली लावता यावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 45 दिवसांचा अतिरिक्त वेळ मागण्यात आला होता. बोलीदारांची संख्या यामुळे वाढली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स, लोन इंडिया, सिटी इन्फ्रास्ट्रक्चर, ग्लोब इकोलॉजिस्टिक्स, ट्रक्स लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स आणि सुगना मेटल्स या दिवाळखोरीच्या प्रक्रियाच्या माध्यमातून कंपनी अधिग्रहणासाठी प्रयत्न करत आहे.

कंपनीवर किती उधारी

गेल्या वर्षी 5 जानेवारी रोजी फ्युचर सप्लाई चेन सोल्यूशन्सच्या दिवाळखोरीची प्रक्रिया एका अर्जानंतर सुरु झाली होती. कंपनीने जवळपास 7.26 कोटी रुपयांची थकबाकी चुकती केलेली आहे. कंपनीवर अजून एकूण 885 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये मुख्यत्वे अझीम प्रेमजी ट्रस्टचे 274 कोटी रुपये, डीएफसी फर्स्ट बँकेचे 158 कोटी रुपये, जेसी फ्लावर्स एसेट रिकंस्ट्रक्शनचे 63 कोटी रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाचे 45 कोटी रुपयांचा समावेश आहे.

कंपनीचा शेअर

शेअर बाजारात फ्चुचर सप्लाई चेन सोल्यूशन्सचा शेअर आहे. त्याची किंमत सध्या 8.15 रुपये आहे. हा शेअर 52 आठवड्यातील निच्चांकावर पोहचला आहे. या शेअरने गेल्या वर्षी मार्च महिन्यात 18.20 रुपयांचा पल्ला गाठला आहे. हा या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.