मुकेश अंबानींची कंपनी 3 वर्षात देणार 10 लाख नोकऱ्या, गुरुवारी केली घोषणा

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांनी जाहीर केले आहे की, त्यांची रिलायन्स रिटेल पुढील तीन वर्षांत दहा लाखाहून अधिक रोजगार निर्माण करेल.

मुकेश अंबानींची कंपनी 3 वर्षात देणार 10 लाख नोकऱ्या, गुरुवारी केली घोषणा
मुकेश अंबानी
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 6:23 PM

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44 व्या एजीएममध्ये मुकेश अंबानी यांनी जाहीर केले आहे की, त्यांची रिलायन्स रिटेल पुढील तीन वर्षांत दहा लाखाहून अधिक रोजगार निर्माण करेल. एजीएम दरम्यान मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स रिटेलची वाढ तीन ते पाच वर्षात 3 पट जास्त होईल. किंबहुना डिजीटलनंतर आता मुकेश अंबानी यांचे लक्ष रिटेल व्यवसाय वाढवण्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी तयारीही केली आहे. एजीएममध्ये, मुकेश अंबानी यांनी ऊर्जा क्षेत्रातही महासत्ता बनण्याबाबत बिगुल वाजवले. (Mukesh Ambani’s company will create 10 lakh jobs in three years)

ऊर्जा व्यवसायात प्रचंड गुंतवणूक

रिटेल व्यतिरिक्त रिलायन्सने ऊर्जा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. कंपनी गुजरातमधील जामनगरमध्ये धीरूभाई अंबानी गीगा कॉम्प्लेक्स तयार करेल. यावर्षी कंपनी नवीन उर्जा व्यवसाया(New Energy Business)ची घोषणा करेल. रिलायन्स रिन्यूएबल एनर्जीमध्ये 60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. आम्ही चार गीगा कारखान्यांनाGiga factories) आधार देण्यासाठी पायाभूत सुविधा व साहित्य पुरवू, असे ते म्हणाले.

अशी तयार केली जातेय योजना

जामनगर कॉम्प्लेक्स या गीगा कारखान्यांना आधार देण्यासाठी आवश्यक सामग्री व उपकरणे तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा व उपयोगिता पुरवेल, जेणेकरुन सर्व महत्वपूर्ण साहित्य वेळेवर उपलब्ध होईल. त्याचबरोबर, कंपनी सौरऊर्जेद्वारे स्वस्त मॉड्युल देईल. कंपनीने सौरऊर्जेवर लक्ष केंद्रित केले आहे. वर्ष 2030 पर्यंत कंपनी 100 जीडब्ल्यू उर्जा क्षमता तयार करेल. कंपनी बॅटरीमध्ये सौर उर्जा साठवण्यावर लक्ष केंद्रित करत राहील. नवीन ऊर्जा व्यवसायात कंपनी 3 वर्षात 75000 कोटींची गुंतवणूक करेल.

मोठ्या घोषणांचा परिणाम नाही

रिलायन्सच्या एजीएममध्ये केलेल्या मोठ्या घोषणांचा फायदा गुंतवणूकदारांना झाला नाही. वास्तविक, एजीएमनंतर रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घट झाली आहे. कंपनीची मार्केट कॅप 13 लाख 87 हजार 952 कोटी रुपयांवर बंद झाली. या घसरणीमुळे रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना आज सुमारे 33,522 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. (Mukesh Ambani’s company will create 10 lakh jobs in three years)

इतर बातम्या

भाजपातील अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक; नाना पटोलेंचा दावा

राज्यात आतापर्यंत 27 टक्के पेरण्या, हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी करावी, कृषीमंत्री दादाजी भुसेंचे आवाहन

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.