Mukesh Ambani : तिजोरीत जागा करा; येणार पैसाच पैसा; रिलायन्स इंडस्ट्रीज करणार मालामाल, शेअर सुसाट धावणार
Mukesh Ambani Reliance Industries : ब्रोकरेज हाऊस Bernstein आणि जेफरिज यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज 2.3 टक्क्यांनी वधारला. तर येत्या काही दिवसात या शेअरमध्ये तुफान येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यात दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरधारकांना मोठा फायदा झाल नाही. या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण दिसली. पण बुधवारी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीजविषयी ब्रोकरेज हाऊस Bernstein आणि जेफरिज यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज 2.3 टक्क्यांनी वधारला. तर येत्या काही दिवसात या शेअरमध्ये तुफान येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रिलायन्समध्ये येणार तुफान
रिलायन्स इंडस्ट्रीजविषयी ब्रोकरेज हाऊस Bernstein आणि जेफरिज यांनी दावा केला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात हा शेअर तुफान चर्चेत येईल. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर 36.2 टक्क्यांच्या तेजीने धावतील. दोन्ही ब्रोकरेज हाऊसनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या अधिक संधी आहेत. तर शॉर्टटर्म गुंतवणूकदारांना आव्हानांचा सामना करावा लागेल.
बुधवारी शेअर पळाला
बीएसईवर बुधवारी कंपनीचा शेअर 1251.20 रुपयांवर उघडला. तर थोड्याच वेळात या शेअरने जोरदार घोडदौड केली. शेअर बीएसईवर 1270.70 रुपयांवर पोहचला. कंपनीचा शेअर आता जुलैचा जादुई अंक गाठण्यापासून 20 टक्के दूर आहे. तर 52 आठवड्यांच्या निच्चांकापेक्षा तो 6 टक्क्यांनी पुढे आहे. त्यात तेजीचे सत्र येण्याची दाट शक्यता आहे.
टार्गेट प्राईस किती?
ब्रोकरेज हाऊस Bernstein ने रिलायन्सवर अधिक विश्वास दाखवला आहे. ब्रोकरेज हाऊसनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 22.50 टक्क्यांच्या तेजीसह 1520 रुपयांची चमकदार कामगिरी करू शकतो. ब्रोकरेज हाऊसनुसार कंपनी टेलिकॉम आणि रिटेल बिझनेसमध्ये मोठी झेप घेऊ शकते. रिफाईनिंगमध्ये पण फायदा होऊ शकतो.
तर दुसरीकडे जेफरिजपण रिलायन्सवर लट्टू आहे. ब्रोकरेज हाऊसने या कंपनीवर 1690 रुपयांचे टार्गेट प्राईस सेट केली आहे. त्यानुसार हा शेअर गुंतवणूकदारांना 36 टक्के रिटर्न देण्याचा दावा करण्यात येत आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.