Multibagger Share | राष्ट्रपती आहेत या उद्योगांचे Chief, कमाईत तर या सरकारी कंपन्या एकदम हिट

Multibagger Share | देशातील अनेक कंपन्यांचे शेअर तर 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतात. पण रिटर्नमध्ये त्यांनी भल्याभल्या कंपन्याना पिछाडीवर टाकले आहे. या कंपन्यांनी 6 महिने ते एका वर्षांत गुंतवणूकदारांना दोन ते तीन पट नफा मिळवून दिला आहे. कोणत्या आहेत या सरकारी कंपन्या? कसे केले त्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल?

Multibagger Share | राष्ट्रपती आहेत या उद्योगांचे Chief, कमाईत तर या सरकारी कंपन्या एकदम हिट
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 4:08 PM

नवी दिल्ली | 12 ऑक्टोबर 2023 : देशातील सर्व सरकारी कंपन्यांचे मालक राष्ट्रपती आहेत. अनेक सरकारी कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. त्यांनी कमाई करुन देण्यात कोणतीच कसर सोडलेली नाही. या कंपन्यांचे शेअर पण अगदी स्वस्त आहे. काही कंपन्यांचे शेअर तर 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीत आहे. सध्या यातील काही कंपन्यांनी जबरदस्त परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे वारे-न्यारे झाले आहेत. एकाच वर्षांत काही कंपन्यांनी 150 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहेत. कोणत्या आहेत या सरकारी कंपन्या? कसे केले त्यांनी गुंतवणूकदारांना लखपती?

एकाच वर्षात छप्परफाड कमाई

IFCI ही सरकारी कंपनी कर्जाचा पुरवठा करते. या कंपनीमध्ये सरकारचा 70 टक्क्यांहून अधिकचा वाटा आहे. एका वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना 155 टक्क्यांहून अधिकचा रिटर्न दिला आहे. या वर्षात कंपनीने 72.70 टक्के रिटर्न दिला आहे. एका महिन्यात 53.63 टक्के परतावा दिला आहे. तर 6 महिन्यात 136 टक्के परतावा दिला आहे. सध्या हा शेअर 24.30 रुपयांच्या घरात आहे.

हे सुद्धा वाचा

HOC चा 42 टक्के परतावा

हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल्स ही एक सरकारी कंपनी आहे. या कंपनीत सरकारची 58.8 टक्के हिस्सेदारी आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना सातत्यपूर्ण परतावा दिला आहे. कंपनीने सहा महिन्यात 42 टक्के तर एका वर्षात 28 टक्के परतावा दिला आहे. आज शेअरमध्ये 2.66 टक्क्यांची उसळी आली आहे. हा शेअर 35.85 रुपयांवर व्यवहार करत आहे.

MTNL चा 52 टक्के रिटर्न

एमटीएनलमध्ये सरकारचा 56.8 टक्के वाटा आहे. या सरकारी कंपनीने 6 महिन्यात 51.72 टक्के रिटर्न दिला आहे. एका वर्षात कंपनीने 33 टक्के परतावा दिला आहे. या वर्षात गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांचा फायदा झाला आहे. तर एका महिन्यात या शेअरने 21 टक्क्यांची झेप घेतली आहे. गुरुवारी कंपनीचा शेअर 6 टक्क्यांच्या तेजीसह 28.80 रुपयांवर व्यवहार करत होता.

युको बँकेची घौडदौड

युको बँकेत सरकारची 95 टक्के हिस्सेदारी आहे. ही बँक सध्या तेजीत आहे. एका वर्षात बँकेने चांगला फायदा मिळवून दिला आहे. एका वर्षात बँकेने 252 टक्के रिटर्न दिला आहे. तर सहा महिन्यात बँकेचा शेअर 63.56 टक्क्यांनी वधारला आहे. गुरुवारी हा शेअर 41.30 रुपयांच्या घरात होता.

HMT शेअरची रॉकेट भरारी

गेल्या सहा महिन्यांपासून एचएमटी शेअर रॉकेट झाला आहे. कंपनीने 157 टक्क्यांचा परतावा दिला आहे. एका वर्षात कंपनीने 129 टक्क्यांची कमाई करुन दिली आहे. तर एका महिन्यात हा शेअर 93 टक्क्यांनी वधारला आहे. आज, गुरुवारी या कंपनीचा शेअर 5 टक्क्यांच्या तेजीसह 68.35 रुपयांवर व्यवहार करत आहे. या कंपनीत सरकारची 93.7 टक्के हिस्सेदारी आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.