वर्षभरात ‘या’ स्टॉकने केले 1 लाखांचे 18 लाख…गुंतवणूकदार झाले मालामाल…

2021 मध्ये ब्राइटकॉम ग्रुपचा स्टॉक मल्टीबॅगर पेनीस्टॉक म्हणून समोर आला. एका वर्षात या शेअरची किंमत 5.80 रुपयांवरून 108 रुपयांपर्यंत वाढली. म्हणजेच, या कालावधीत गुंतवणूकदारांना सुमारे 1800 टक्के परतावा मिळाला आहे. यामुळे गुंतवणूकदार मालामाल झालेले दिसले.

वर्षभरात ‘या’ स्टॉकने केले 1 लाखांचे 18 लाख...गुंतवणूकदार झाले मालामाल...
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 10:10 PM

गेल्या सहामाहीचा विचार केल्यास साधारणतः शेअर बाजाराचा आलेख खाली आलेला दिसून येत आहे. यात, अनेक गुंतवणूकदारांना नुकसानदेखील सोसावे लागले आहे. परंतु असेही काही शेअर्स म्हणजे स्टॉक्स्‌ आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांची निराशा होऊ दिली नाही. त्यापैकी एक म्हणजे, मल्टीबॅगर स्टॉक… मल्टीबॅगर स्टॉक ब्राइटकॉम ग्रुप (Brightcom Group ) मध्ये आज 5 टक्के लोअर सर्किट आहे. शेअर ( Stock ) 5 टक्क्यांनी घसरून 108.20 रुपयांवर आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर जवळपास 39 टक्क्यांनी घसरला आहे. असे असूनही, गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना यातून बंपर परतावा मिळाला आहे. 2021 मध्ये ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स मल्टीबॅगर पेनीस्टॉक असल्याचे समोर आले आहे. एका वर्षात या शेअरची किंमत 5.80 रुपयांवरून 108 रुपयांपर्यंत वाढली. म्हणजेच, या कालावधीत गुंतवणूकदारांना (Investors) सुमारे 1800 टक्के परतावा मिळाला आहे.

गुंतवणूकदार झाले मालामाल

शेअर बाजारातील वारंवार होणाऱ्या घसरणीमुळे हा शेअर गेल्या एक महिन्यापासून काहीसा तणावात होता. महिन्याभरापूर्वी ब्राइटकॉम समूहाचा शेअर १७७ रुपये होता, तो आता १०८ रुपयांवर आला आहे. इतकंच नाही तर या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 204.80 रुपये आहे, तर वर्षभरात या स्टॉकची निचांकी पातळी केवळ 5.80 रुपये होती. ब्राइटकॉम ग्रुपच्या स्टॉकने वर्षभरात 1800 टक्के परतावा दिला आहे. तुम्ही 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्याकडे 3.20 लाख रुपयांची रक्कम तयार झाली असती. दुसरीकडे, जर तुम्ही वर्षभरापूर्वी ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमची गुंतवणूक 18 लाख रुपयांपर्यंत वाढली असती.

काय आहे कंपनीची वैशिष्ट्ये

ब्राइटकॉम ग्रुप ही 2000 मध्ये स्थापन झालेली डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. या कंपनीचा व्यवसाय यूएसए, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, उरुग्वे, मेक्सिको, यूके, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, युक्रेन, सर्बिया, इस्रायल आणि चीन या ठिकाणी आहे. ब्राइटकॉम समूहाने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.

इतर बातम्या:

Supreme Court : उत्पादन शुल्क आकारणीबाबत राज्यांना मर्यादित अधिकार; सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Russia Ukraine War : युक्रेन-रशिया पुन्हा वाटाघाटीच्या टेबलावर, युद्धावर तोडगा निघणार?

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.