Multibagger Stock | लग्नसराईत विना मेहनत होणार कमाई, ही गुंतवणूक ठरेल फायद्याची

Multibagger Stock | देशात दिवाळीनंतर लग्नसराईचा हंगाम सुरु होणार आहे. या काळात खरेदीचा सुकाळ असेल. या काळात भारतात शेअर बाजारातील काही कंपन्या तुम्हाला मालामाल करु शकतात. वेडिंग सीझनमध्ये या कंपन्यांचे शेअर धुवांधार बॅटिंग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांगली कमाई होऊ शकते. त्यांना कमाई करता येऊ शकते. कोणते आहेत हे स्टॉक्स?

Multibagger Stock | लग्नसराईत विना मेहनत होणार कमाई, ही गुंतवणूक ठरेल फायद्याची
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 9:30 AM

नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : अनेकांना माहिती नाही, पण भारतीय लग्नसराई हा जितका आनंदाचा सोहळा आहे, दोन जीवांचे, दोन कुटुंबांची गाठ बांधण्याचे पवित्र कार्य आहे, तेवढेच हा मोठा व्यवसाय पण आहे. आश्चर्य वाटले ना? पण एका अंदाजानुसार लग्नसराईत भारतात गेल्यावर्षी 130 अब्ज डॉलरची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. हा देशातील चौथा मोठा उद्योग आहे. हा उद्योग ऑटो आणि आयटी सेक्टरपेक्षा पण अधिक आहे. दरवर्षी त्यात वाढ होत आहे. लग्नसराईला आता इव्हेंटचे स्वरुप येत आहे. हॉटेल, फूड, बेव्हरेजस, ज्वेलरी आणि कपड्यांच्या बाजार गजबजलेला असतो. या काळात शेअर बाजारातून गुंतवणूकदारांना मोठ्या कमाईची संधी आहे.

टायटन कंपनी

टाटा समूहाच्या टायटन कंपनीचा स्टॉक कमाई करुन देऊ शकतो. कंपनीचा ज्वेलरी विभाग 90 टक्के महसूल मिळवून देतो. ही कंपनी तनिष्क, जोया, मिया आणि कॅरेटलेन या माध्यमातून आभूषणे, दागिन्यांची विक्री करते. या कंपनीच्या मनगटी घड्याळींची विक्री जोरात होते. त्यांची मागणी अधिक आहे.

हे सुद्धा वाचा
  1. वॉच मार्केटमध्ये कंपनीचा वाटा 60 टक्के आहे.
  2. गेल्या 6 महिन्यात या कंपनीने जवळपास 17 टक्के परतावा दिला आहे.
  3. यावर्षात कंपनीने 21 टक्के परतावा दिला आहे.
  4. एका वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये 15 टक्क्यांचा रिटर्न दिसून आला.

इंडियन हॉटेलचा शेअर

गेल्या काही वर्षांत हॉटेल इंडस्ट्रीचा महसूल वाढला आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ही सर्वात मोठी हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे. या अंतर्गत ताज हॉटेलला ब्रँड फायनान्स या संस्थेनुसार, 2022 मध्ये जगातील हॉटेल व्यवसायात भारतीय हॉटेल क्षेत्राचे जोरदार योगदान दिसून आले. या क्षेत्राने मोठी मुसंडी मारली आहे. कोविडनंतर हे क्षेत्र तेजीत आहे.

  1. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचा महसूल 5 वर्षांत 6.6 टक्क्यांनी वधारला.
  2. या कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये निव्वळ नफा 9.7 अब्ज रुपये होता.
  3. गुरुवारी कंपनीचा शेअर 3.50 टक्क्यांनी घसरला. हा शेअर 375.55 रुपयांवर बंद झाला होता.
  4. 6 महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 10.46 टक्क्यांची तेजी दिसून आली.
  5. एका वर्षात कंपनीच्या नफ्यात जवळपास 17 टक्क्यांची वाढ दिसून आली.

वेदांत फॅशन

वेदांत फॅशनच्या पोर्टफोलिओत मान्यवर, मोहे आणि मंथन असे ब्रँड आहेत. या ब्रँडने बाजारात चांगली मांड ठोकली आहे. या कंपनीने अनेक शहरात फ्रँचाईज दिल्या आहेत. त्यामुळे अगदी निम्न शहरात सुद्धा हा ब्रँड दिसून येतो. लग्नसराईत या ब्रँडच्या कपड्यांची मोठी मागणी आहे.

  1. या आर्थिक वर्षात कंपनीच्या नफ्यात गेल्या आर्थिक वर्षापेक्षा 36.3 टक्क्यांनी वाढला
  2. या कंपनीवर कर्जाचा मोठा भार पण नाही.
  3. गुरुवारी कंपनीचा शेअर घसरला. तो 212.50 रुपयांवर बंद झाला होता.
  4. गेल्या 6 महिन्यात कंपनीचा शेअर 23 टक्क्यांनी घसरला.
  5. गुंतवणूकदरांचे एका वर्षांत 26 टक्क्यांहून अधिकचे नुकसान झाले.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.