Multibagger Stock : 10 हजाराचे पाहता पाहता 33 लाख; कंपनीवर फारसं कर्ज पण नाही, गुंतवणूकदार म्हणाले अगोदर कसं कळलं नाही

Multibagger Stock Return : बाजारात चढउताराचे सत्र सुरू असताना या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना बंपर फायदा करून दिला. 5 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज 33,00,000 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.

Multibagger Stock : 10 हजाराचे पाहता पाहता 33 लाख; कंपनीवर फारसं कर्ज पण नाही, गुंतवणूकदार म्हणाले अगोदर कसं कळलं नाही
या शेअरची दमदार उसळी
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 3:46 PM

BSE वरील सुचीबद्ध कंपनी Hazoor Multi Projects ने कमाल केली. या शेअरने दमदार कामगिरी बजावली. जोरदार परतावा दिला. स्मॉल कॅप प्रकारात ही कंपनी मोडते. हजूर मल्टि प्रोजेक्ट्स कंपनीने 5 वर्षांत 10,000 रुपयांचा 33,00,000 लाख रुपये इतका परतावा दिला. या कंपनीकडे देशातंर्गत गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. हा शेअर गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. ज्यांनी लवकर गुंतवणूक केली आणि स्टॉक होल्ड करून ठेवला. त्यांना मोठा फायदा झाला आहे.

नवीन शेअर बाजारात आणणार

17 डिसेंबर 2024 रोजी Hazoor Multi Projects ची बैठक झाली. यामध्ये कंपनीने निधी जमवण्याची योजना आखली आहे. त्यानुसार, 30 रुपये प्रति शेअर (1 रुपये फेस वॅल्यू आणि 29 रुपये प्रिमियम) वर 22,22,220 नवीन इक्विटी शेअर आणण्यास मंजूरी देण्यात आली आहे. हे शेअर 2,22,222 वॉरंट्सच्या 10 पट इक्विटी शेअरमध्ये बदलण्यात आल्यानंतर देण्यात येतील. पूर्वी हे वॉरंट 300 रुपये प्रति दराने जाहीर झाले होते.

हे सुद्धा वाचा

Hazoor Multi Projects Ltd च्या शेअरची कामगिरी

Hazoor Multi Projects चा शेअर आज बुधवारी सकाळच्या सत्रात 0.89 टक्क्यांनी तेजीत होता. हा शेअर आता दुपारी 15:32 वाजता, 52.23 रुपयांच्या उतरणीवर होता. गेल्या आठवडाभरात हा शेअर 7 टक्क्यांनी घसरला. एका महिन्यात हा शेअर 3.45 टक्क्यांच्या तेजीत आहे. तर एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 86 टक्क्यांचा परतावा दिला. ऑक्टोबर 2020 मध्ये हा शेअर 15 पैशांवर व्यापार करत होता. एकाच वर्षात या शेअरने 28.23 रुपये निच्चांकी आणि 63.90 च्या उच्चांकी कामगिरी बजावली. जर पाच वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 10 हजारांची गुंतवणूक केली असती तर आज हा परतावा 33,00,000 लाख रुपये इतका असता.

West Midlands Ventures Pvt. Ltd ला दिले शेअर

कंपनीने West Midlands Ventures Pvt. Ltd ला शेअर वाटप केले होते. हा गुंतवणूकदार त्यांच्या प्रमोटर समूहात नाही. या कंपनीने 75 टक्के रक्कम जमा केली आहे. 225 रुपये प्रति वॉरंट ही रक्कम मोजण्यात आली.

शेअर फंडामेंटल काय?

आजपर्यंत या कंपनीचे मार्केट कॅप 1,046 कोटी रुपये आहे.

या शेअरचा PE Ratio 1.49 इतका तर रिटर्न ऑन इक्विटी ( ROE ) 21.90 टक्के इतका आहे.

शेअरची बुक व्हॅल्यू 19.32 रुपये आहे. म्हणजे शेअर त्याच्या बुक व्हॅल्यूच्या 2.77 पट दराने व्यापार करत आहे.

या कंपनीवर अगदी नगण्य कर्ज आहे. या शेअरचा फेस व्हॅल्यू 1 रुपये इतका आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.