Multibagger Stock : या शेअरने पाडला पैशांचा पाऊस, एक लाखांचे झाले 65 लाख..

Multibagger Stock : या शेअर्सने गुंतवणूकदारांना चार वर्षांत छप्परफाड कमाई करुन दिली आहे.

Multibagger Stock : या शेअरने पाडला पैशांचा पाऊस, एक लाखांचे झाले 65 लाख..
या शेअरने केल मालामालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 12:04 AM

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारात सध्या (Stock Market) चढ-उताराचे तीव्र पडसाद उमटत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) पुन्हा भारतीय बाजारावर विश्वास दाखविल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. कोरोना (Corona-19) आणि त्यानंतरच्या महागाईने (Inflation) सर्वच क्षेत्रावर जोरदार प्रभाव टाकलेला असतानाही काही शेअर्संनी जोरदार कामगिरी केली आहे.

सनमीत इन्फ्रा या कंपनीच्या शेअरने (Sanmit Infra share) गुंतवणूकदारांना जोरदार लॉटरी लावली आहे. या मल्टिबॅगर स्टॉकने (Multibagger Stock) 4 वर्षातच गुंतवणूकदारांची चांदीच चांदी केली आहे.

Sanmit Infra हा पेनी स्टॉक आहे. भल्याभल्यांना विश्वास बसणार नाही, असा रिटर्न या पेनी स्टॉकने दिला आहे. या शेअरने 5,365 टक्के परतावा दिला आहे. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, या शेअरने गुंतवणूकदारांना तगडा फायदा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

मनी कंट्रोलच्या एक अहवालाचा आधार देत याविषयीचे वृत्त देण्यात आले आहे.त्यानुसार, 10 रुपयांची फेस व्हॅल्यू असणाऱ्या या शेअरने गुंतवणूकदारांना एक रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे 10 शेअर दिले आहेत.

हा मल्टीबॅगर शेअर 31 ऑक्टोबर 2022 रोजी एक्सस्प्लिट झाला. त्यानंतर या 17 नोव्हेंबर रोजी या स्टॉकने 85.70 रुपयांची उच्चांकी कामगिरी केली. सोमवारी बीएसईवर या शेअरमध्ये किंचित तेजी दिसून आली. हा शेअर 71.40 रुपयांवर बंद झाला.

सनमीत इन्‍फ्राचा शेअर मंगळवारी NSE वर थोडा वधारला. हा शेअर बाजारात 71.60 रुपयांवर व्यापार करत होता. गेल्या महिनाभरात या शेअरने जवळपास 15 टक्क्यांची वृद्धी दिसून आली.

गेल्या 6 महिन्यांत या शेअरने 75 टक्क्यांची उसळी घेतली आहे. या वर्षात 2022 मध्ये आतापर्यंत 139.38 टक्क्यांचा परतावा दिला आहे. एका वर्षांत सनमीत इन्फ्राने 214 टक्क्यांचा फायदा करुन दिला. 5 वर्षांत 5,365 टक्क्यांचा परतावा या शेअरने दिला आहे.

21 डिसेंबर 2018 रोजी हा शेअर 1.31 रुपये होता. चार वर्षानंतर आज या शेअरची किंमत 85.70 रुपयांपर्यंत पोहचली होती. जर चार वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एखाद्याने एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 65 लाख रुपये झाले असते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.