Multibagger Stocks | गुंतवणूकदारांच्या उड्या, या शेअरने दिला जोरदार परतावा

Multibagger Stocks | या मल्टिबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कमाईसाठी हा बेस्ट स्टॉक असल्याचे समोर आले आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना आतापर्यंत 500 टक्क्यांचा परतावा दिला आहे. टाटा समूहातील तेजस नेटवर्क लिमिटेडने या कंपनीला 608 लाखांची ऑर्डर दिली आहे. आता या शेअरवर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

Multibagger Stocks | गुंतवणूकदारांच्या उड्या, या शेअरने दिला जोरदार परतावा
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 3:32 PM

नवी दिल्ली | 28 ऑक्टोबर 2023 : सायबर सुरक्षेची साधनसामग्री पुरवणाऱ्या या कंपनीचा शेअर मल्टिबॅगर ठरला आहे. सध्या शेअर बाजारात मोठी पडझड सुरु आहे. गुंतवणूकदार त्यामुळे चितांतूर झाले आहेत. त्यांना दिलासादायक एक आठवडा हवा आहे. जागतिक घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. या कंपनीच्या शेअरने बाजारातील चढउतारात चांगला परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांना 500 टक्के परतावा दिला आहे. या कंपनीला टाटा समूहातील तेजस नेटवर्क लिमिटडने आता 608 लाखांची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे हा शेअर लांब पल्ला गाठेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कोणती आहे ही कंपनी

Valiant Communications Limited असं या कंपनीचे नाव आहे. या कंपनीला तेजस नेटवर्क लिमिटेडने सहा कोटींहून अधिकची ऑर्डर दिली आहे. तेजस भुतान पॉवर सिस्टिम ऑपरेटरसोबत काम करत आहे. तेजस अनेक विकास आणि उत्पादनात अग्रेसर आहे. वालिएंट कम्युनिकेशन्सचे आणि तेजसचे दहा वर्षांपासून व्यावसायिक संबंध आहेत. दोन्ही कंपन्या अनेक प्रकल्पात सोबत होते.

हे सुद्धा वाचा

महसूलात झाली वाढ

या कंपनीने महसूलात आघाडी घेतली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही निकालात कंपनीने चांगली कामगिरी बजावली आहे. या कालावधीत कंपनीचा महसूल 9.66 कोटींवर पोहचला. त्यात 84.42 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीला या कालावधीत 1.77 कोटींचा नफा झाला आहे. त्यामुळे या कंपनीविषयी गुंतवणूकदार आशावादी आहेत.

काय करते कंपनी

ही कंपनी सायबर सुरक्षा, कम्युनिकेशन, ट्रान्समिशन या क्षेत्रात काम करते. ही कंपनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक कंपन्यांसोबत काम करत आहे. त्यांच्यासाठी काही उत्पादनं तयार करत आहे. यामध्ये पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ही महत्वाची संस्था आहे. इतर ही अनेक संस्थासोबत कंपनी काम करत आहे. गेल्या तीन वर्षांत या कंपनीने 500 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या शेअरमध्ये शुक्रवारी तेजीचे सत्र होते. हा शेअर 4.76 टक्क्यांनी वधारला. हा शेअर 272 रुपयांवर पोहचला आहे. 52 आठवड्यात हा शेअर 324.95 रुपयांच्या उच्चांकावर होता तर गेल्या . 52 आठवड्यातील या कंपनीचा निच्चांक 111.25 रुपये आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.