Multibagger Share : या शेअरने 1 लाखांचे केले 4.42 कोटी! गरिबीचे दिवस मागे हटले

Multibagger Share : शेअर बाजारात चढउताराचे सत्र आहे. पडझड होत असताना बाजारात तेजीचे सत्र पण येते. या घडामोडीत एका शेअरकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. दिग्गज कंपन्या जो कारनामा करु शकल्या नाहीत, तो फायदा या शेअरने गुंतवणूकदारांना मिळवून दिला.

Multibagger Share : या शेअरने 1 लाखांचे केले 4.42 कोटी! गरिबीचे दिवस मागे हटले
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 3:46 PM

नवी दिल्ली | 3 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजार (Share Market) दोलायमान स्थितीत आहे. कधी उताराकडे झुकतो तर कधी उसळी घेतो. अनेक दिग्गज कंपन्या बाजारातील या चढाओढीत पिळून निघत आहेत. कंपन्यांना चढउताराच्या या सत्रात बळी तो कानपिळीचा प्रत्यय येत आहे. पण बाजारात अशा ही काही कंपन्या आहेत, ज्या बाजारातील या दबावतंत्राला पुरुन उरल्या आहेत. दिग्गज कंपन्यांना या वातावरणात घामाटा फुटला असताना या कंपनीने मात्र जोरदार परतावा (Huge Return) दिला आहे. या कंपनीने आठच वर्षांत गुंतवणूकदारांचे 1 लाखांचे 4.42 कोटी रुपये केले आहे. हा परतावा अनेक पटीत आहे. त्यामुळे अनेकांची गरिबी कुठल्या कुठं पळून गेली आहे.

अशी मारली जोरदार मुसंडी

या 29 सप्टेंबर रोजी या कंपनीचा शेअर 443.10 रुपयांवर होता. तर त्यापूर्वी या कंपनीचा शेअर 433.50 रुपयांवर होता. या शेअरने आतापर्यंत चांगली घौडदौड केली आहे. या कंपनीचे बाजारातील भांडवल 5,178 कोटी रुपये आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, हा शेअर आतापर्यंत मल्टिबॅगर ठरला आहे. या शेअरने 44,210 टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या 8 वर्षांत या शेअरने मोठी झेप घेतली आहे. जानेवारी 2015 मध्ये हा शेअर 1 रुपयांवर होता. तिथून त्याने आता 443.10 रुपयांचा पल्ला गाठला आहे. या शेअरने आठच वर्षांत गुंतवणूकदारांचे 1 लाखांचे 4.42 कोटी रुपये केले आहे.

हे सुद्धा वाचा

कोणती आहे कंपनी, काय करते काम

मॅगेलॅनिक क्लाऊड लिमिटेड (Magellanic Cloud Limited) असं या आयटी सेवा कंपनीचे नाव आहे. ही कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे, कन्सल्टिंगचे आणि ह्युमन रिसोर्सचे काम करते. ही कंपनी एक प्रकारे प्लेसमेंटचे काम पण करते. सध्या ही कंपनी युरोप, अमेरिका आणि आशियात कामगिरी बजावत आहे. या कंपनीने जोरदार फायदा नोंदवला आहे.

नफ्याचे गणित जमवले

गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला 11.65 टक्के नफा मिळाला होता. तर या आर्थिक वर्षांत कंपनीने नफ्यात घौडदौड कायम ठेवली आहे. आकडेवारीनुसार नफ्याची टक्केवारी 17.33 इतकी आहे. या कंपनीने जून तिमाहीत मोठा नफा कमवला. 57 टक्के नफा मिळवला. जून तिमाहीत कंपनीने 137 कोटी रुपये कमावले. गेल्यावर्षी याच काळात कंपनीचा नफा 87 कोटी रुपये होता. कंपनीच्या महसूलात पण वाढ झाली आहे. या कंपनीने गेल्या सहा महिन्यात 128 टक्के परतावा दिला तर एका वर्षात कंपनीने 451 टक्क्यांचा परतावा नोंदवला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.