म्युच्युअल फंडची कोटीची उड्डाण, एसआयपीकडे वाढता कल; हजारो कोटींची उलाढाल

मार्च महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून रेकॉर्डब्रेक गुंतवणूक करण्यात आली. मार्च महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून 12128 कोटींंची गुंतवणूक करण्यात आली.

म्युच्युअल फंडची कोटीची उड्डाण, एसआयपीकडे वाढता कल; हजारो कोटींची उलाढाल
म्युच्युअल फंडImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 10:34 PM

नवी दिल्ली- शेअर बाजारात (Share market) तेजीचं चक्र गतिमान झालं आहे. गुंतवणुकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गुंतवणुकदारांनी म्युच्युअल फंडचा मार्ग अवलंबित रेकॉर्डब्रेक गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंड असोसिएशन AMFI च्या डाटानुसार इक्विटी फंडमध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली. मार्च महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात 28463 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. मासिक आधारावर तब्बल 44 टक्क्यांची तेजी नोंदविली गेली आहे. म्युच्युअल फंडातील सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा सलग 13 वा महिना ठरला आहे. तेजी-घसरणीच्या काळात विदेशी गुंतवणूकदार (Forign Investor) शेअर्स विक्रीच्या मार्गावर आहेत. निम्न जोखमीचा विचार करणाऱ्या गुंतवणुकदारांनी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा पर्याय कायम ठेवला आहे. मार्च महिन्यात शेअर बाजारात 5.2 टक्क्यांची तेजी नोंदविली गेली. फेब्रुवारी महिन्यात 4.4 टक्क्यांची घसरण दिसून आली होती.

एम्फीच्या डाटानुसार, मार्च महिन्यात 28463 कोटी, फेब्रुवारी महिन्यात 19705 कोटी, जानेवारी महिन्यात 14888 कोटी, डिसेंबर महिन्यात 25077 कोटी रुपये म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतविण्यात आले. म्युच्युअल फंडच्या विविध श्रेणीअंतर्गत गुंतवणुकीचा विचार केल्यास लार्ज आणि मिड कॕपमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली. मार्च महिन्यात लार्ज कॕप फंडात 3052 कोटी आणि मिड कॕप फंडात 2193 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली.

SIP द्वारे रेकॉर्डब्रेक

मार्च महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून रेकॉर्डब्रेक गुंतवणूक करण्यात आली. मार्च महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून 12128 कोटींंची गुंतवणूक करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात 11 हजार कोटी गुंतवणूक होती.

AUM डाउन

मध्यंतरीच्या काळात विद्ड्रॉलचा सपाटा लावल्यामुळे अॕसेट अंडर मॕनेजमेंट (AUM) मध्ये घसरण झाली. मार्च महिन्यात AUM 37.8 लाखांवर पोहोचले. फेब्रुवारी महिन्यात 38.56 लाखावर होते.

एसआयपी म्हणजे काय?

SIP म्हणजे स्वंयअर्थशिस्त असलेली गुंतवणूकच म्हणा ना. त्याला इंग्रजीत सिस्टेमॅटीक इन्व्हेसमेंट प्लॅन म्हणतात. याचा मुख्य फायदा म्हणजे बाजारातील उलाढालीचा एकदम फटका गुंतवणुकदाराला बसत नाही. यात बाजारातील धोक्याचा कमी फटका बसतो. SIP मासिक, त्रैमासिक, सहामही अथवा वार्षिक असते. ही गुंतवणूक स्वयंचलित करता येते. त्याचा पर्याय निवडल्यास महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला तुमची मासिक ठरलेली रक्कम वळती होते. त्यासंबंधीचे अलर्ट तुम्हाला आगाऊ एसएमएस अथवा ई-मेलद्वारे मिळते. SIP चा आणखी एक फायदा हा असतो की, ज्यावेळी बाजार घसरणीच्या वळणावर असतो. तेव्हा SIP द्वारे केलेल्या गुंतवणुकीत जास्त युनिट खरेदी केले जातात

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.