Mutual Fund : नवीन वर्षात गुंतवणुकीचं प्लॅनिंग, या 5 म्युच्युअल फंडमध्ये आजमावा नशीब, रिटर्न मिळतील बंपर..
Mutual Fund : नवीन वर्षात गुंतवणुकीची योजना आखात असला तर या 5 म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येईल.
नवी दिल्ली : नवीन वर्षात प्रत्येक जण काही ना काही संकल्प करतो. नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचं प्लॅनिंग (Investment Planning) आखात असला तर चांगल्या परताव्यासाठी तुम्हाला हे 5 म्युच्युअल फंड मदत करु शकता. म्युच्युअल फंड (Mutual Fund) परंपरागत गुंतवणुकीपेक्षा चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला तगडे रिटर्न (Good Return) मिळतात. मात्र ही गुंतवणूक जोखिमेची असते. नवीन तंत्रज्ञानामुळे यातील गुंतवणूक आता सोपी झाली आहे. या योजनेत चक्रवाढ व्याजामुळे चांगला परतावा मिळतो. हा काही गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांच्या मदतीने तुम्ही गुंतवणूक करु शकता.
म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय आहे. यामध्ये इक्विटी, डेड इन्स्ट्रुमेंट आणि इतर अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करता येते. क्रिसिलच्या रेटिंगनुसार म्युच्युअल फंडची कामगिरी जोखता येते. त्यानुसार तुम्हाला गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय मिळतो.
SBI Contra Fund क्रिसिलच्या रेटिंगमध्ये हा पहिल्या क्रमांकाचा म्युच्युअल फंड आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठी चांगला परतावा मिळतो. या फंडने गेल्या तीन वर्षात गुंतवणूकदारांना 31.85 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. इतका परतावा हा सर्वोत्तम मानन्यात येतो.
ICICI बँक, HDFC बँक आणि अॅक्सिस बँकेत SBI Contra फंडचे टॉप होल्डिंग्स आहेत. ही जोखिमेची गुंतवणूक आहे. या योजनेत मोठी रक्कम इक्विटीत गुंतविल्या जाते. पण परतावा चांगला मिळतो.
Quant Small cap Fund या फंडला ही क्रमवारीत पहिले स्थान आहे. हा फंड स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. दीर्घकालावधीसाठी केलेल्या गुंतवणुकीत चांगला परतावा मिळतो. या फंडने तीन वर्षांत जवळपास 56 टक्के परतावा दिला आहे.
Franklin India Flexi Cap Fund या फंडलाही क्रिसिलने नोव्हेंबर महिन्यात रँकिंगमध्ये पहिले स्थान दिले आहे. या फंडमध्ये जोखिम थोडी कमी आहे. या फंडात नियमीत लाभांशही मिळतो. या फंडने तीन वर्षांत वार्षिक 21 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या फंडचा 66 हिस्सा लार्ज कॅप होल्डिंग्समध्ये आहे.
SBI Large & Midcap Fund हा लार्ज आणि मिडकॅप या दोघांचे मिश्रण आहे. क्रिसिलच्या रेटिंगमध्ये हा ही पहिल्या क्रमांकाचा फंड आहे. डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओत दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा देते. तीन वर्षांत 22 टक्के तर पाच वर्षांत या फंडने 13.47 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
Parag Parikh Tax Saver Fund ही एक इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम आहे. या योजनेतंर्गत 80C प्रमाणे कर सवलत मिळते. या फंडने गेल्या तीन वर्षांत 24 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जोखिम असली तरी चांगला परतावा आणि कर सवलत या जमेच्या बाजू आहेत.