नांदेडमध्ये देशातील सर्वात महाग इंधन, धर्माबादमध्ये पेट्रोल नाबाद 98

नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी 98 रुपये 29 पैसे मोजावे लागत आहेत (Nanded Dharmabad Costliest Petrol Diesel)

नांदेडमध्ये देशातील सर्वात महाग इंधन, धर्माबादमध्ये पेट्रोल नाबाद 98
Petrol
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 3:42 PM

नांदेड : पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे वाहनचालकांचं कंबरडं मोडण्याची वेळ आली आहे. नांदेडमध्ये महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात सर्वात महागडे पेट्रोल विकलं जात आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आले आहेत. (Nanded Dharmabad Costliest Petrol Diesel)

धर्माबादमध्ये महाग पेट्रोल का?

नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी 98 रुपये 29 पैसे मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी 87 रुपये 70 पैसे द्यावे लागत आहेत. धर्माबादला सोलापूरच्या ऑइल डेपोतून इंधन पुरवठा होतो, हे अंतर अधिकचे असल्याने इथे इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. मात्र शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यात प्रति लिटर पाच रुपयाने इंधन स्वस्त आहे.

भोपाळमध्ये प्रीमियम पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर

बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती 90 पार पोहोचल्या आहेत. महानगरांमध्ये पेट्रोलचे दर 95 च्याही पुढे गेले आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये प्रीमियम पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर पोहोचली आहे. अतिरिक्त प्रीमियम पेट्रोलची किंमत प्रति लिटर 99.99 रुपये आहे. तर साध्या पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 96.69 रुपयांवर पोहोचली आहे. यावेळी डिझेल 87.20 रुपये तर प्रीमियम डिझेलची किंमत 91.31 रुपयांवर गेली आहे.

सात दिवसात इंधनाच्या किमती किती वाढल्या?

गेल्या सात दिवसात पेट्रोलच्या किमतीत 2.08 रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 2.23 रुपये वाढ झाली. आता फक्त फेब्रुवारी महिन्याबद्दलच बोलायचं झालं तर डिझेलच्या किंमतीमध्ये 2.58 रुपये आणि पेट्रोलमध्ये 2.43 रुपये प्रतिलिटर वाढ झाली. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे स्थानिक शहरांमध्ये कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले.

तीन अंकी डिस्प्लेच नाही

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा थेट परिणाम पेट्रोल पंपांवर झाला आहे. कारण पेट्रोलच्या मशीनमध्ये 3 अंकी डिस्पेलच नाही आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी ऐन सुट्टीच्या दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर

दिल्ली (Delhi Petrol Price Today): 88.73 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 95.21 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today):90.01 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today): 90.96 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Petrol Price Today): 87.50 रुपये प्रतिलिटर

संबंधित बातम्या :

Petrol at 100: ऐन महागाईत पेट्रोलचंही शतक, 3 अंकी किंमतीमुळे पंप पडले बंद

(Nanded Dharmabad Costliest Petrol Diesel)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.