AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींच्या कारभारावरही नरसिंह राव अन् मनमोहन सिंग भारी; कॉंग्रेस PM च्या कार्यकाळातच गुंतवणूकदारांची सर्वाधिक कमाई

इतिहासाची आकडेवारी पाहिल्यास आजही कॉंग्रेसचे नरसिंह रावांच्या कार्यकाळात गुंतवणूकदारांनी सर्वाधिक कमाई केल्याचं दिसून येतंय. या शर्यतीतही अटलबिहारी वाजपेयी ते गुजरालपर्यंत अनेक पंतप्रधानांना त्यांनी मागे सोडलेय. Narasimha Rao Manmohan Singh investors highest earnings

मोदींच्या कारभारावरही नरसिंह राव अन् मनमोहन सिंग भारी; कॉंग्रेस PM च्या कार्यकाळातच गुंतवणूकदारांची सर्वाधिक कमाई
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 9:38 PM

नवी दिल्लीः मोदी सरकार सत्तेत येऊन 7 वर्षे झालीत, या सात वर्षांत देशात बऱ्याच गोष्टी बदलल्यात. त्याच वेळी गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे लोकांच्या जीवनात बरेच बदल झालेत. कोरोना काळात भारताच्या शेअर बाजारानेही अनेक विक्रम नोंदवलेत. परंतु इतिहासाची आकडेवारी पाहिल्यास आजही कॉंग्रेसचे नरसिंह रावांच्या कार्यकाळात गुंतवणूकदारांनी सर्वाधिक कमाई केल्याचं दिसून येतंय. या शर्यतीतही अटलबिहारी वाजपेयी ते गुजरालपर्यंत अनेक पंतप्रधानांना त्यांनी मागे सोडलेय. (Narasimha Rao and Manmohan Singh are heavy on Modi’s administration; The highest earnings of investors during the tenure of the Congress PM)

शेअर बाजारामधील सर्वाधिक परतावा गुंतवणूकदारांना मिळाला

माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंहराव सुरुवातीपासूनच त्यांच्या दूरदृष्टीसाठी परिचित होते. कदाचित हेच कारण आहे की, त्यांच्या कार्यकाळात शेअर बाजारामधील सर्वाधिक परतावा गुंतवणूकदारांना मिळाला. 21 जून 1991 रोजी नरसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले. त्या दिवशी शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1337 अंकांवर होता, परंतु 16 मे 1996 रोजी त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला, तेव्हा शेअर बाजाराचा सेन्सेक्स 3823 अंकांवर पोहोचला होता. म्हणजे नरसिंह राव यांच्या कार्यकाळात बाजाराने गुंतवणूकदारांना 186 टक्के परतावा दिला.

अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये गुंतवणूकदार निराश

कॉंग्रेस सरकारमध्ये गुंतवणूकदारांनी खूप पैसे कमावले. त्याचवेळी भाजपाचे अटलबिहारी वाजपेयी सरकारने गुंतवणूकदारांना निराश केले. अटलबिहारी बाजपेयी तीन वेळा पंतप्रधान होते. परंतु तिन्ही वेळा गुंतवणूकदार निराश झाले. पहिल्या टर्ममध्ये गुंतवणूकदारांना -3 टक्के परतावा मिळाला. तर दुसऱ्यांदा 30 टक्के परतावा मिळाला. वाजपेयींच्या शेवटच्या कार्यकाळात गुंतवणूकदारांना 0 टक्के परतावा मिळाला.

मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला

मे 2004 मध्ये पुन्हा एकदा कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले. यावेळी अर्थव्यवस्थेची नाडी मनमनोहन सिंग यांच्या हाती होती. मनमोहन राजांच्या कारकिर्दीत बाजारात वेग आला. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत गुंतवणूकदारांना नरसिंहराव यांच्यासारख्या परतावा प्रथमच पाहायला मिळाला. या कालावधीत गुंतवणूकदारांना बाजारातून 180 टक्के परतावा मिळाला.

मोदी सरकारमध्ये 111 % परतावा

जर आपण मोदी राज्याची तुलना मनमोहन सिंग आणि नरसिंह राव यांच्याशी केली, तर गुंतवणूकदारांना पी. व्ही. नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात मोदी कार्यकाळाच्या तुलनेत तितकासा परतावा मिळाला नाही. मोदींच्या राज्यात गुंतवणूकदारांना मे 2014 ते जून 2021 पर्यंत शेअर बाजारामध्ये केवळ 111 टक्के परतावा दिला.

संबंधित बातम्या

LIC IPO: ‘या’ महिन्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता, लिस्टिंगनंतर कंपनी यादीत रिलायन्सला टाकेल मागे

अझीम प्रेमजींच्या विप्रोनं रचला इतिहास, पहिल्यांदाच बाजारमूल्य तीन लाख कोटींच्या पुढे

Narasimha Rao and Manmohan Singh are heavy on Modi’s administration; The highest earnings of investors during the tenure of the Congress PM

S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर.
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा.
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब
भारतावरील हल्ला पाकिस्तानला भोवला, भारताचा करारा जवाब.
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.