5 वर्षांत 15 लाखांचे होतील 20 लाख; चक्रवाढ व्याजसह संपूर्ण गुंतवणुकीची हमी, अजून काय हवे?

Post Office: टपाल खात्याच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत अवघ्या पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर ग्राहकाला थोडे थोडके नव्हे तर तब्बल पाच लाखांचा फायदा मिळणार आहे. NSC योजनेवर सध्या वार्षिक 6.8 टक्के दराने व्याज मिळत आहे. त्याविषयी जाणून घेऊयात.

5 वर्षांत 15 लाखांचे होतील 20 लाख; चक्रवाढ व्याजसह संपूर्ण गुंतवणुकीची हमी, अजून काय हवे?
बचत योजनेतून मालामालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 11:36 AM

पोस्ट कार्यालयातील (Post Office) अल्पबचत योजनेतील (Small Saving Scheme) गुंतवणुकीतून तुम्ही अवघ्या पाच वर्षांत चांगला परतावा मिळू शकतात. ही योजना गुंतवणुकदारांसाठी अगदी फायदेशीर असून चक्रवाढ व्याजाच्या करिष्म्यातून ग्राहकाला जोरदार परतावा मिळू शकतो.सध्या शेअर बाजारातील घसरण गुंतवणुकदारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक गुंतवणुकदारांनी गेल्या सहा महिन्यांत लाखो रुपयांचे नुकसान सहन केले आहे. अशावेळी पोस्ट खाते तुमच्या मदतीला आहे. या योजनेत पाच वर्षांत तुम्ही 20 लाखांचा निधी उभारू शकता.एवढ्या अल्पकाळात मोठा निधी उभारण्यासाठी गुंतवणुकदारांना टपाल खात्याच्या अल्प बचत योजनांमध्ये पैसा गुंतवावा लागेल. पोस्ट खात्यामार्फत बचतीसाठी अनेक प्रकारच्या सरकारी गुंतवणूक योजना चालवण्यात येतात. यामध्ये बचतीसोबतच ग्राहकांना चक्रवाढ व्याजाचा (Compound Interest) मोठा लाभ ही मिळतो. विशेष म्हणजे या बचत योजनांना सरकारचे अभय असल्याने या योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही संपूर्णता सुरक्षित असते.

NSC मध्ये हमखास परतावा

टपाल खात्यातील योजनांमधील गुंतवणूक चांगल्या परताव्यासोबतच रक्कमेवर सुरक्षा ही प्रदान करतात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate) ही योजना गुंतवणुकदारांसाठी फायदेशीर आहे. या योजनेत अवघ्या 5 वर्षात 20 लाख रुपयांचा परतावा मिळवता येतो. रक्कम जास्त गुंतवल्यास गुंतवणुकदारांना करोडपती सुद्धा होता येते. पाच वर्षांत चक्रवाढ व्याजाच्या बळावर हा करिष्मा करता येतो. विशेष म्हणजे तुमच्या गुंतवणुकीवर कर सवलतही मिळते. अगदी 100 रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत कमाल दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवर खात्रीशीर परताव्यासोबतच सुरक्षिततेची पूर्ण हमी मिळते.

हे सुद्धा वाचा

चक्रवाढ व्याजाचा लाभ

या योजनेचा सर्वात चांगला फायदा म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या पट्टीत त्यावर चक्रवाढ व्याज जमा होत राहते. 100 रुपयांपासून दीड लाखांपर्यंत ग्राहकाला या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत सध्या सरकार वार्षिक 6.8 टक्के दराने व्याज देत आहे. कम्पांऊड इंटरेस्टच्या मदतीने गुंतवणुकदाराची रक्कम कालावधी पूर्ण होण्यापूर्वी चांगलीच वाढते. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. गुंतवणुकदाराची इच्छा असेल तर या योजनेचा कालावधी वाढविता येतो. 5 वर्षांनी या योजनेत आणखी गुंतवणूक करता येते.

कर लाभ

या योजनेत गुंतवणुकदाराला कर सवलतही (Tax Benefit) मिळते. ग्राहकाने केलेल्या एकूण गुंतवणुकीवर सरकार प्राप्तिकराच्या कलम 80C अंतर्गत वजावटीचा लाभ देते. दीड लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेवर गुंतवणुक करता येते. व्याजातून ग्राहकाला होणारा फायदा करपात्र आहे. गुंतवणुकदार व्याज उत्पन्न परताव्यात जमा करू शकतो.

असे मिळवा 20 लाख रुपये

या योजनेतंर्गत 5 वर्षांत 20.58 लाख रुपये मिळवता येतात. त्यासाठी तुम्हाला 15 लाख रुपये गुंतवावे लागतील. चक्रवाढ व्याजाचा या रक्कमेवर फायदा मिळेल. कम्पांऊंड इंटरेस्टच्या माध्यमातून 6.8 टक्के दराने तुम्हाला 6 लाख रुपयांचा फायदा मिळेल. त्यामुळे गुंतवणुकदाराला 20.58 लाख रुपये मिळतील. तुमच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात तुम्हाला फायदा मिळेल. पाच वर्षांसाठी तुम्ही योजनेत एक लाख रुपये गुंतवल्यास व्याजाद्वारे 1,38,949 रुपये मिळतील. तर 2 लाखांच्या गुंतवणुकीवर व्याजासहीत 2,77,899 रुपये हाती येतील. 5 लाख गुंतवणुकीवर 6,94,746 रुपये मिळतील.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.