कर्जात बुडालेल्या देशांना बाहेर काढण्याची गरज; आर्थिक संकटात सापडलेल्या देशांबद्दल भारताला चिंता – निर्मला सितारमण

आर्थिक संकटात सापडलेल्या, कर्जात (Debt) बुडालेल्या देशांना वाचवण्याची गरज असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी म्हटले आहे. शुक्रवारी निर्मला सीतारम यांची जागतिक बँकेचे (World Bank) अध्यक्ष डेविड मलपास यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये त्या बोलत होत्या.

कर्जात बुडालेल्या देशांना बाहेर काढण्याची गरज; आर्थिक संकटात सापडलेल्या देशांबद्दल भारताला चिंता - निर्मला सितारमण
निर्मला सितारमण, अर्थमंत्री
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 7:12 AM

आर्थिक संकटात सापडलेल्या, कर्जात (Debt) बुडालेल्या देशांना वाचवण्याची गरज असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी म्हटले आहे. शुक्रवारी निर्मला सीतारम यांची जागतिक बँकेचे (World Bank) अध्यक्ष डेविड मलपास यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत बोलताना अर्थमंत्र्यांनी म्हटले की, सध्या जागतिक स्थरावर अशांतता आहे. रशिया आणि युक्रेमध्ये युद्ध सुरू आहे. याचा मोठा फटका हा जागतिक अर्थव्यवस्थेला बसला आहे. अद्यापही कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था पूर्णपणे सावरलेली दिसत नाही. याचा अनेक देशांना फटका बसला आहे. अनेक देश सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अशा देशांबद्दल भारताला चिंता वाटत असून, संबंधित देशांना वाचवण्याची गरज असल्याचे निर्मला सितारमण यांनी म्हटले आहे. आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या जागतिक बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी निर्मला सितारमण या अमेरिका दौऱ्यावर होत्या, याचवेळी त्यांनी जागतिक बँकेंचे अध्यक्ष डेविड मलपास यांच्यासोबत देखील जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केली.

श्रीलंकेतील आर्थिक संकटावर चर्चा

दरम्यान यावेळी झालेल्या बैठकीमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी श्रीलंकेत निर्माण झालेल्या संकटाबाबत देखील चिंता व्यक्त केली आहे. श्रीलंकेत सध्या गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. श्रीलंका कर्जात बुडाली आहे. महागाई गगनाला भिडली आहे, चलनाचा तुटवडा असल्यामुळे इंधन आयातीवर देखील मर्यादा आल्या आहेत. नागरिक इंधनासाठी रांगा लावत असल्याचे पहायला मिळत आहे. श्रीलंकेसारख्या देशांना आर्थिक संकटाच्या खाईतून वाचवण्याची गरज असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी म्हटले आहे.

श्रीलंकेला भारताची पुन्हा मदत

श्रीलकेंमधील आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे. चलनाचा तुटवडा असल्यामुळे इंधन आयात करण्यावर देखील मर्यादा आल्या आहेत. देशात मोठ्या प्रमाणात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंधनाचा तुटवडा असल्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. नागरिक इंधनासाठी रांगा लावत असल्याचे चित्र आहे. श्रीलंकेला इंधन संकटातून बाहेर काढण्यासाठी भारताने मदतीचा हात दिला आहे. भारताने श्रीलंकेला इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलरच्या कर्जाला मंजुरी दिली आहे. हा आमच्यासाठी मोठा दिलासा असल्याचे श्रीलंकेच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Today Petrol Diesel price : सलग 19 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर, कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ

Reliance : रिलायन्स-फ्यूचर डील रद्द, 24 हजार कोटींचा व्यवहार बासनात; बँकाचा विरोध

Economic crisis in Sri Lanka; श्रीलंकेला भारताचा मदतीचा हात, इंधन खरेदीसाठी 50 कोटी डॉलरचे कर्ज

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.