Today Petrol, Diesel Rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
Today Petrol, Diesel Rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात राज्यासह देशाच्या प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol, Diesel Rates) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. गेल्या 21 मे पासून म्हणजे तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 22 मे रोजी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर साडेनऊ रुपयांची तर डिझेलच्या दरात प्रति लिटर सहा रुपयांची कपात करण्यात आली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. दुसरीकडे राज्यात शिंदे, फडणवीस सरकार येताच त्यांनी पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली, त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात काहीशी घसरण झाली मात्र अद्यापही इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर हे अधिक आहेत.
देशाच्या प्रमुख शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये आहे, तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.76 रुपये एवढा आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये एवढा आहे. तर एक लिटर डिझेलसाठी 94.24 रुपये मोजावे लागत आहेत. देशाच्या प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या दराची तुलना केल्यास सर्वात स्वस्त पेट्रोल, डिझेल दिल्लीमध्ये तर सर्वात महाग पेट्रोल, डिझेल हे मुंबईमध्ये मिळत आहे.
दररोज जारी केले जातात नवे दर
देशात गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र तरी देखील पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज इंधनाचे नवे दर जारी केले जातात. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पेट्रोल, डिझेलचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाचे दर वाढले की पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात. कच्च्या तेलाचे दर कमी झाले की पेट्रोल, डिझेलचे दर देखील कमी होतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर नियमीतपणे जारी करण्यात येत असतात.