फक्त 634 रुपयांमध्ये मिळणार हा LPG सिलिंडर, वजनाला ही हलका, ने-आण करण्यासाठी येणार नाही कुठली ही अडचण

घरगुती गॅसच्या कंपन्यांनी ही कात टाकली असून नवीन तंत्रज्ञानाच्या साथीने त्यांनी बदल केले आहे. त्यात कंपोझिट गॅस सिलिंडर (composite gas cylinder) हा नवा प्रयोग करण्यात येत आहे. घरातील लोखंडी गॅस टाकीपेक्षा वजनाने हा सिलिंडर अत्यंत हलका असून तो ने-आण करण्यात अडचण येत नाही

फक्त 634 रुपयांमध्ये मिळणार हा LPG सिलिंडर, वजनाला ही हलका, ने-आण करण्यासाठी येणार नाही कुठली ही अडचण
गॅस सिलिंडरचे दर वाढले
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 9:45 AM

मुंबई : वजनाने हलका आणि किंमतीत स्वस्त अशा कंपोझिट गॅस सिलिंडरची(composite gas cylinder)सध्या बाजारात चर्चा आहे. बदलत्या जमान्याचा हा नवीन गॅस आहे. दिल्लीत या गॅस सिलिंडरची किंमत 634 रुपयांत तर जयपूर येथील ग्राहकांना हा सिलिंडर 637 रुपयांना मिळत आहे. कंपोझिट गॅस सिलिंडरमध्ये 10 किलोचा गॅस येतो. कंपोझिट सिलिंडर हे पुर्णतः पारदर्शक असते. कमी वजनामुळे हा सिलिंडर एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी घेऊन जाण्यात अडचण येत नाही. कमी सदस्य असलेल्या कुटुंबासाठी हा गॅस सिलिंडर फायदाच ठरतो.

कंपोझिट गॅस सिलिंडर म्हणजे काय

कंपोझिट गॅस सिलिंडर लोखंडी गॅस सिलिंडरपेक्षा वजनाने 7 किलो हलका असतो. त्यामुळे त्याची ने-आण करणे सोपे असते. घरगुती गॅस सिलिंडरचे वजन 17 किलो असते. कंपोझिट सिलिंडर वजनात हलके असले तरी ते मजबूत असतात. यामध्ये थ्री-लेअर (Three Layer) असतात. 10 किलोच्या कंपोझिट सिलिंडरमध्ये तेवढाच गॅस असतो. त्यामुळे याचे एकूण वजन 20 किलो एवढे होते. तर लोखंडी गॅस सिलिंडरचे गॅस मिळून एकूण वजन 30 किलो पेक्षा जास्त होते.

शहरानुसार दरामध्ये फरक

इंडियन ऑईलनुसार, (Indian Oil) 10 किलोच्या कंपोझिट गॅस सिलिंडरसाठी मुंबईत ग्राहकाला 634 रुपये मोजावे लागतात. तर कोलकत्ता शहरात या सिलिंडरचा दर 652 रुपये आहे. चेन्नईमधील ग्राहकाला हा सिलिंडर 645 रुपयांना खरेदी करता येईल. लखनऊमध्ये ग्राहकाला या सिलिंडरसाठी 660 रुपये मोजावे लागतील. बिहारची राजधानी पाटणा शहरात हा गॅस सिलिंडर 697 रुपयांना मिळतो. तर इंदुर शहरात या गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांना 653 रुपये मोजावे लागतात. भोपाळमध्ये या सिलिंडरची किंमत 638 रुपये आहे. तर गोरखपूरमध्ये या सिलिंडरसाठी 677 रुपये ग्राहकाला द्यावे लागतील.

नवीन जोडणीसाठी द्यावे लागेल एवढी रक्कम

नवीन ग्राहकांना कंपोझिट गॅस सिलिंडर घ्यायचा असेल तर नवीन जोडणी(Connection) करुन घ्यावी लागेल. इंडेन (Inden) ने याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, नवीन कंपोझिट गॅस सिलिंडर घ्यायचा असेल तर ग्राहकांना 10 किलोसाठी 3350 रुपये आणि 5 किलो वजनाच्या सिलिंडरसाठी 2150 रुपये मोजावे लागतील. 10 किलोच्या सिलिंडरसाठी जवळपास 692 रुपये तर 5 किलो वजनासाठी 363 रुपये मोजावे लागतील. या गॅसला जुने रेग्युलेटर लावलेले असतील. सिलिंडर पारदर्शक असल्याने गॅस किती शिल्लक आहे हे बाहेरून दिसेल. 10 किलोच्या सिंलिंडरमध्ये जुन्या सिलिंडरच्या तुलनेत 4 किलो गॅस कमी असेल .

इतर बातम्या:

LIC स्वस्तात मस्त पॉलिसी: 28 रुपयांची बचत, 2 लाखांचा लाभ; जाणून घ्या फायदे

Digital Payment | भारतीयांचा रेकॉर्डब्रेक UPI वापर, 4 वर्षात 70 पटींनी वाढले डिजिटल पेमेंट!

ऑनलाईन फसवणुकीची दखल पोलीस घेत नाहीत? सायबर भामट्यांशी लढण्याचा ई-पर्याय

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.