पुढील दोन महिने देशात खाद्यतेलाचा तुटवडा जाणवणार नाही; खाद्यतेल पुरवठा उद्योजकांचे सरकारला अश्वासन
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज दहावा दिवस आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दबाव वाढत असून, कच्च्या तेलासह खाद्यतेलाच्या किमती देखील वाढल्या आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात तेलाचा पुरवठा कमी पडणार नाही, तसेच भाव नियंत्रित राहातील यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज दहावा दिवस आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर दबाव वाढत असून, कच्च्या तेलासह खाद्यतेलाच्या (Edible Oil) किमती देखील वाढल्या आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात तेलाचा पुरवठा कमी पडणार नाही, तसेच भाव नियंत्रित राहातील यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. शुक्रवारी अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुर्यफूल तेलासह खाद्यतेलाच्या पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला खाद्यतेल पुरवठा उद्योग व संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पुढील दोन महिने सूर्यफूल आणि इतर खाद्यतेलांचा पुरवठा सुरुळीत सुरू राहिल असे आश्वासन या बैठकित खाद्यतेल पुरवठा उद्योग व संघटनांच्या प्रतिनिधींकडून गोयल यांना देण्यात आले आहे. आपण मोठ्याप्रमाणात सुर्यफूल तेलाची आयात रशिया आणि युक्रेनमधून करतो. मात्र सध्या फ्रान्स आणि रशियामध्ये युद्ध सुरू असल्याने खाद्यतेलाचा पुरवाठ बाधित होऊ नये याकडे सरकारचे विशेष लक्ष आहे.
बैठकित विविध संघटनांच्या प्रतिनिधिंचा सहभाग
पियुष गोयल यांनी आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला खाद्यतेलाचा पुरवठा कसा सुरळीत राहील यावर चर्च करण्यात आली. यावेळी बोलताना पुढील दोन महिने देशात खाद्यतेलाचा पुरवठा सुरळीत सुरू राहिल असे बैठकीत सहभागी झालेल्या उद्योग संघटनांच्या प्रतिनिधिंनी म्हटले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. मोहरीचे नवीन पीक आले आहे. त्यामुळे मोहीरीच्या तेलाचे दर आणखी कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी, इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशन सरचिटणीस एसपी कामरा आणि अदानी विल्मर, रुची सोया आणि मोदी नॅचरल्ससह प्रमुख रिफायनर्स आणि आयातदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठीकमधे सध्या तरी सूर्यफूल तेलाचा तुटवडा नसल्याची माहिती गोयल यांनी दिली.
दर महिन्याला 18 लाख टन खाद्यतेलाची आवश्यकता
भारतामध्ये दर महिन्याला 18 लाख टन खाद्यतेलाचा वापर होतो. यामध्ये सूर्यफूल तेलाचा वाटा दीड ते दोन लाख टन एवढा आहे. भारत सर्वाधिक सूर्यफूल तेलाची आयात युक्रेन आणि रशियामधून करतो. मात्र आता युद्ध सुरू असल्याने पुरवठा खंडित होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यावर बोलताना अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की, जरी देशात सूर्यफूल तेलाचा तुटवडा जाणवला तरी काळजी करण्याचे कारण नाही. कारण आपल्याकडे सूर्यफूल तेलाला मोहरी आणि सोयाबीनचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तेलाचा पुरवठा कमी होऊन दर वढणार नाही याकडे सरकारचे लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या
रशिया-युक्रेन युद्धाची धग थेट किचनपर्यंत, सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका
Russia-Ukraine war : बिस्किट खरेदीपासून ते हॉटेलमधील जेवणापर्यंत सर्वच वस्तू महागणार!
भारताच्या स्टार्टअप मध्ये गुंतवणूकदारांचा वाढला कल, देशात वेगाने झेप घेतोय यूनिकॉर्न क्लब!