Nifty 50 ETF : गुंतवणूक कमी, पण जोरदार परताव्याची हमी, योजनाच तशी भारी

Nifty 50 ETF : या योजनेत जोखीम ही कमी आणि परताव्याची हमी आहे..

Nifty 50 ETF : गुंतवणूक कमी, पण जोरदार परताव्याची हमी, योजनाच तशी भारी
गुंतवणूक कमी, परताव्याची हमीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 7:07 PM

नवी दिल्ली : इक्विटीचे (Equity Share) एबीसीडी माहिती नसणारे ही याकडे ज्यादा कमाईच्या आशेने आकर्षित होतात. ज्यादा पैसा कोणाला नकोय,नाही का? महागाईवर (Inflation) मात करण्यासाठी शेअर बाजार ही संधी उपलब्ध करुन देतो. आता ही संधी एकतर तुम्हाला थेट शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणुकीतून मिळविता येतो. अथवा म्युच्युअल फंडातील ( Mutual Fund) गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळविता येतो.

पण अनेकदा योग्य म्युच्युअल फंड मिळत नाही. अथवा ज्यात गुंतवणूक करता, तो जबरदस्त पळत नाही, अशी काहीशी अवस्था होते. तर थेट स्टॉक (Direct Stock) खरेदी करणेही धोक्याचे ठरते. कारण बाजाराची चाल माहिती नसते. बाजार भावनेवरही हिंदोळे घेतो. त्याचाही फटका बसू शकतो.

शेअरमध्ये थेट गुंतवणुकीसाठी तुम्हाला त्या कंपनीची आर्थिक स्थिती, तिचा व्यवसाय, व्यावसायिक मूल्य, वृद्धी, नवीन प्रकल्प, फंडामेंटल्स, उद्योगाची गती, बाजारतील परिस्थिती या सर्वांचा अभ्यास असणे आवश्यक असते.

हे सुद्धा वाचा

पण याचा अर्थ तुम्हाला बाजार माहिती नाही, बाजाराचे गणित उमजत नाही म्हणजे कमाईच करता येणार नाही, असे होत नाही. त्यासाठी आणखी एक पर्याय आहे. तो म्हणजे Nifty 50 ETF मध्ये गुंतवणुकीचा.

Nifty 50 ETF (Exchange Traded Fund) हा गुंतवणुकीचा सर्वात सोपा मार्ग आहे. ईटीएफ एका विशिष्ट सूचकांक, निर्देशांकाचा मागोवा घेतो आणि त्याच दिशेने वाटचाल करतो. म्युच्युअल फंड हाऊस ईटीएफ सादर करतात.

निफ्टी 50 ईटीएफचे एक वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला अत्यंत कमी गुंतवणुकीत या योजनेत सहभागी होता येते. ईटीएफचे एक युनिट तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करु शकतात. तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम यामध्ये गुंतवू शकता.

निफ्टी 50 इंडेक्स (Nifty 50 Index) मध्ये बाजारातील सर्वात मोठ्या भारतीय कंपन्यांचा सहभाग आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये त्यांना थेट गुंतवणुकीची संधी मिळते आणि पोर्टफोलिओत विविधता (diversified portfolio) ठेवता येते.

Nifty 50 ETF मुळे बाजारातील धोक्याची, जोखीमेचा अंदाज येतो. बाजाराची गतीशिलता, बाह्यघटकांचा परिणाम, कंपन्यांवर बातम्यांचा होणार परिणाम या सर्व गोष्टी लक्षात येतात. कमी गुंतवणुकीत तुम्हाला जादा कमाई करता येते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.