Nirmala Sitharaman | फेरीवाल्यांना प्रत्येकी 10 हजारापर्यंत कर्ज, सीतारमण यांची मोठी घोषणा
फिरत्या विक्रेत्यांसाठी मोदी सरकारने 5 हजार कोटी रुपयांची विशेष योजना जाहीर केली. (Nirmala Sitharaman announces Special Credit Facility for street vendors)
नवी दिल्ली : ‘कोरोना’च्या संकटकाळात रस्त्यावरील फिरते विक्रेते म्हणजेच फेरीवाल्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हातावर पोट असलेल्या या वर्गासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलासादायक घोषणा केली. त्यानुसार फेरीवाल्यांना प्रत्येकी 10 हजारापर्यंत कर्ज मिळणार आहे. (Nirmala Sitharaman announces Special Credit Facility for street vendors)
फिरत्या विक्रेत्यांसाठी मोदी सरकारने 5 हजार कोटी रुपयांची विशेष योजना जाहीर केली. सरकार येत्या महिन्याभरात ही विशेष योजना सुरु करणार आहे. याचा लाभ देशभरातील अंदाजे 50 लाख फेरीवाल्यांना होणार आहे.
काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये?
– ‘कोरोना’च्या संकटकाळात फिरते विक्रेते किंवा फेरीवाल्यांना मोठा आर्थिक फटका – सुलभ कर्जासाठी येत्या महिन्याभरात विशेष योजना – 10 हजारांचे खेळते भांडवल (वर्किंग कॅपिटल) मिळणार – आर्थिक देयकाद्वारे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जाईल – वेळेत परतफेड केल्यास वर्किंग कॅपिटल क्रेडिट वाढवून उपलब्ध करुन दिले जाईल. – सुमारे 50 लाख पथ विक्रेत्यांना लाभ – 5000 कोटींची सुविधा
Government to support nearly 50 lakh street vendors
Rs 5000 cr Special Credit Facility for #StreetVendors; #AatmaNirbharBharatPackage pic.twitter.com/MKKRQUwV2N
— PIB India #StayHome #StaySafe (@PIB_India) May 14, 2020
संबंधित बातम्या :
मजुरांना 2 महिने मोफत धान्य, कमी भाड्यात घर, फेरीवाल्यांसाठी 5 हजार कोटी
वन नेशन वन रेशन कार्ड, शहरी मजुरांना कमी भाड्यात घर
(Nirmala Sitharaman announces Special Credit Facility for street vendors)