Nirmala Sitharaman | आरोग्य, शिक्षण, मनरेगासाठी विशेष तरतुदी, 20 लाख कोटींचे पॅकेज नेमकं कसं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजपासून ही पाचवी पत्रकार परिषद आहे (Nirmala Sitharaman Live Updates)

Nirmala Sitharaman | आरोग्य, शिक्षण, मनरेगासाठी विशेष तरतुदी, 20 लाख कोटींचे पॅकेज नेमकं कसं?
Follow us
| Updated on: May 17, 2020 | 1:49 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषण केली होती. या पॅकेजची  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन  यांनी सलग पाच दिवस पत्रकार परिषद घेत माहिती दिली. आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मनरेगा, आरोग्य, शिक्षण, व्यापार, राज्य सरकार यांसह विविध सात क्षेत्रांसाठी उपाययोजनांची घोषणा केली. Nirmala Sitharaman Press Conference Fifth Day Live Updates)

आरोग्य क्षेत्र 

  • कोरोना संकटकाळात 15 हजार कोटींची मदत करण्यात आली. यात राज्यांना 4 हजार 113 कोटी रुपये दिले गेले. आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा कवच देण्यात येईल.
  • आरोग्य सेवेतील कामगारांच्या सुरक्षेसाठी साथीच्या आजार कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे.
  • केंद्राने 51 लाख पीपीई किट्स पुरवले गेले. तर 85 लाख N95 मास्क राज्यांना पुरवण्यात आले.
  • आपल्याकडे 300 पीपीई उत्पादक आहेत, तर 11 कोटीपेक्षा अधिक एचसीक्यू गोळ्या पुरवल्या आहेत.
  • प्रत्येक जिल्ह्यात संसर्गजन्य आजार रुग्णालय विभाग उभारणार
  • ग्रामीण भागात प्रयोगशाळा नेटवर्क मधील तफावत दूर करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा उभारण्यात येणार
  • सार्वजनिक आरोग्यावरील खर्च वाढवला जाईल
  • ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य आणि कल्याण केंद्रासाठी तळागाळातील गुंतवणूक वाढवली जाणार
  • खाजगी आणि सार्वजनिक निधी द्वारे रुग्णालये आणि प्रयोगशाळा उभारण्यावर मोठा भर
  • आरोग्यासाठी राष्ट्रीय संस्थात्मक मंच स्थापन केली जाणार
  • राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची देखील अंमलबजावणी

शिक्षण 

  • दोन महिन्यात स्वंय प्रभाच्या तीन चॅनल शालेय शिक्षणासाठी  सुरु केले.
  • आणखी 12 चॅनल शाळांसाठी सुरु करणार
  • शिक्षकांचे लाईव्ह वर्ग चॅनलवर दाखवणार
  • टाटास्काय व एअरटेलही शैक्षणिक व्हिडीओ दाखवणार, याचा उपयोग शहरी आणि ग्रामीण भागातील मुलांसाठी उपयुक्त.
  • शिक्षण आणि अध्ययन सुरू ठेवण्यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे
  • ई-पाठशालांतर्गत 200 नवी पुस्तके आणली
  • शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातल्या संवादात्मक सत्राचे प्रसारण करण्यासाठी तरतूद
  • मल्टी मोड डिजिटल ऑनलाईन शिक्षण मंच पीएम विद्या लवकरच सुरु करणार
  • शालेय शिक्षणासाठी दिक्षा आणि वन नेशन वन प्लॅटफॉर्मचा समावेश
  • प्रत्येक वर्गासाठी 1 दूरचित्रवाणी वाहिनी 
  • पीएम विद्यामध्ये कम्युनिटी रेडिओ आणि पॉडकास्टचा व्यापक वापर
  • दिव्यांग मुलांसाठी विशेष डिजिटल सामुग्री
  • अव्वल 100 विदयापीठे आता 30 मे 2020 पासून ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करू शकतील.

मनरेगा

  • मनरेगाला बजेटमध्ये 61 हजार कोटी.
  • जे मजूर गावी परतले आहेत, त्यातील ज्यांना मनरेगामध्ये नोंदणी करण्याची इच्छा आहे. त्यांना रोजगार पुरवण्यात येणार
  • ग्रामीण भागात अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी मनरेगासाठी अतिरिक्त 40,000 कोटी रुपयांची तरतूद

व्यवसाय 

  • ‘व्यवसायात सुलभता’ आणण्यासाठी सरकार पुढील टप्प्यात मिशन मोडवर काम करत आहे
  • कंपनी कायदातंर्गत विविध तरतुदी अंतर्गत अनुपालन ओझं कमी करण्यासाठी वेळोवेळी पावले उचलण्यात आली
  • दिवाळखोरी आणि नादारी कायदा झाल्यानंतर 44% वसुली झाली. कोरोनाचा फटका उद्योगांना झेलावा लागणार नाही  याची खातरजमा केली.
  • कोविड’ निगडीत कर्जे ‘डीफॉल्ट’ प्रकारात समाविष्ट नसतील.
  • 1 कोटीपर्यंतच्या चुकांसाठी कंपन्यांवर खटले नाही.
  • दिवाळखोरीची मर्यादा एक कोटीवर नेल्याने सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना दिलासा
  • सात नियमांना अपराधिक श्रेणीतून वगळणार

राज्य सरकारे आणि संबंधित संसाधने

  • RBI ने अॅडवान्स लिमिट 60 टक्क्यांनी वाढवली
  • ओवरड्राफ्ट मर्यादाही 14 वरुन 21 दिवसांवर
  • जीएसडीपीची मर्यादा 3 वरुन 5 टक्क्यांवर
  • कर्ज घेण्याची मर्यादा राज्यांनी 14 टक्क्यापर्यंतच नेली
  • राज्यांची 86% पर्यंतची कर्जमर्यादा शिल्लक
  • राज्यांना 4.28 लाख कोटींचे नवे कर्ज उपलब्ध
  • राज्यांना सलग 21 दिवस ओवरड्राफ्ट काढता येतील
  • तिमाहीत 32 ऐवजी 52 दिवस ओवरड्राफ्ट ठेवता येणार

केंद्र सरकार सर्व राज्य सरकारना मदत करत आहे, एप्रिल महिन्यात डेव्होलेशन ऑफ टॅक्सेसचे 46 हजार 38 कोटी रुपये देण्यात आले, वार्षिक बजेटमध्ये सर्व तरतूद करण्यात आली होती, मात्र अचानक हे संकंट आलं, त्यामुळे आम्ही राज्यांना 46 हजार 38 कोटी रुपये राज्यांना दिले.

स्टेट डिजास्टर रिस्पॉन्स फंडचे 11 हजार 92 कोटी रुपये राज्यांना देण्यात आले. तर  4 हजार 113 कोटी रुपये कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी देण्यात आले.

कसे आहे 20 लाख कोटींचे पॅकेज 

  • पहिला टप्पा – 5,94,550 कोटी
  • दुसरा टप्पा – 3,10,000 कोटी
  • तिसरा टप्पा – 1,50,000 कोटी
  • चौथा-पाचवा टप्पा – 48,100 कोटी
  • पंतप्रधान गरीब कल्याण – 1,92,800 कोटी
  • रिझर्व बँकेच्या घोषणा – 8,01,603 कोटीएकूण – 20,97,053 कोटी

Nirmala Sitharaman Live Updates

देशव्यापी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याचा कालावधी आज (17 मे) संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या टप्प्याची घोषणा आधीच केलेली आहे. मात्र त्याचे नियम आणि अटी काय असतील, कोणत्या भागांना शिथिलता मिळणार, कुठे निर्बंध अधिक कठोर होणार, याविषयी आज घोषणा होण्याची शक्यता आहे.

निर्मला सीतारमन यांनी काल कोळसा, खनिजक्षेत्र, संरक्षण उत्पादने, विमानतळे, हवाईहद्द व्यवस्थापन, दुरुस्ती, अवकाश, ऊर्जा पारेषण कंपन्या आणि अणुऊर्जा या आठ क्षेत्रांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. संरक्षण क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण 49 टक्क्यांवरुन 74 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. देशात तयार होणाऱ्या शस्त्रांचे उत्पादन वाढवण्यात येणार आहे. तसेच काही संरक्षण साहित्याची आयात रोखणार आहे.

संबंधित बातम्या :

कोळसा उद्योगाला 50 हजार कोटी, संरक्षण क्षेत्रात 74 % FDI, इस्रो ते वीजनिर्मिती, 8 मोठ्या घोषणा

शेती, दुग्धव्यवसाय, फळ उद्योगांसह कृषी क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

संरक्षण क्षेत्र, कोळसा, खाणकाम, वीजनिर्मिती, हवाई क्षेत्राला पॅकेज

फेरीवाल्यांना प्रत्येकी 10 हजारापर्यंत कर्ज, सीतारमण यांची मोठी घोषणा

जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल, कृषिमाल नियंत्रणमुक्त

शेती संबंधित उद्योगांसाठी 1 लाख कोटींची तरतूद : अर्थमंत्री

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 3 लाख कोटींचे विना हमी कर्ज, गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ

15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना आणखी 3 महिने ईपीएफ सहाय्य

(Nirmala Sitharaman Press Conference Fifth Day Live Updates)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.