Nitin Gadkari : टोल नाक्यावर नाही कापणार टॅक्स, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा, हा राहील नवा पर्याय..

Nitin Gadkari : टोल नाक्यावरील कराविषयी आता नियमात हा बदल झाला आहे..

Nitin Gadkari : टोल नाक्यावर नाही कापणार टॅक्स, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा, हा राहील नवा पर्याय..
टोल टॅक्सचे नवे तंत्रज्ञानImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 10:21 PM

नवी दिल्ली : महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी (Passenger) महत्वाची बातमी आहे. त्यांना टोल नाक्यावर (Toll Plaza) ना लांबच लांब रांगावर ताटकाळत थांबावं लागेल ना, पैशावरुन, चिल्लरवरुन त्यांचा वाद होईल. वा फास्टॅगमध्ये (FASTag) रक्कम ठेवण्याचा विसर पडल्याने वेळेवर फसगत होणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari On Toll Tax) यांनी टोल टॅक्ससंदर्भात नियमात बदल झाल्याची माहिती दिली आहे. टोल टॅक्स विषयी कायद्याचा प्रस्ताव (Bill) तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मते, सध्या देशात टोल टॅक्स न भरल्यास कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद नाही. पण रस्ते विकासासाठी निधीची मोठी आवश्यकता असते. त्यासाठी टोल टॅक्स तर बंद होणार नाही. पण वसूल करण्याची पद्धत बदलेल.

आगामी काळात टोल टॅक्स वसूल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येईल. टोल टॅक्स वसूलीसाठी तंत्रज्ञानावर भर देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी काही पद्धत बदलण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

या सर्वासाठी कायद्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. टोल टॅक्स न भरणाऱ्या वाहनधारकांना शिक्षेची कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे नवीन कायदेशीर प्रस्तावानुसार, टोल टॅक्स थेट तुमच्या खात्यातून कापल्या जाणार आहे.

त्यामुळे आता तुम्ही टोल नाक्यावर तास न तास थांबणार नाहीत. तसेच चिल्लर, रोखीचे कोणतेही वाद होणार नाही. तसेच फास्टटॅगची झंझटही संपणार आहे. पण टॅक्समधून तुमची काही सूटका होणार नाही. थेट बँक खात्यातून रक्कम वळती होणार आहे.

गडकरी यांनी केलेल्या दाव्यानुसार, 2024 मध्ये देशात एकूण 26 ग्रीन एक्सप्रेसवे तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर भारत ग्रीन एक्सप्रेसवे बाबत भारत अमेरिकेची बरोबरी करणार आहे. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करत टोल टॅक्स वसूल होणार आहे.

आता नवीन नियमानुसार, तुम्ही जेवढे अंतर कापाल तेवढाच टोल भरावा लागणार आहे. पूर्वी 10 किलोमीटर अंतर कापले तरी 75 किलोमीटरपर्यंताचे शुल्क भरावे लागत होते. आता यामध्ये बदल करण्यात येणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.