Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ 80 हजार कोटींवर कुणाचाच दावा नाही; Zerodha कंपनीने सूचवला जालीम उपाय

झिरोधाने आपल्या ग्राहकांना एक विशेष सुविधा दिली आहे की ज्या अंतर्गत खातेधारक त्यांच्या खात्यात ऑनलाईन नामांकित जोडू किंवा बदलू शकतात. एवढेच नाही तर जर एक वर्षापर्यंत व्यवहार न झाल्यामुळे डिमॅट खाते सक्रिय झाले नाही तर त्याची माहिती नामनिर्देशित व्यक्तीला एसएमएस किंवा ईमेल द्वारे दिली जाईल.

'त्या' 80 हजार कोटींवर कुणाचाच दावा नाही; Zerodha कंपनीने सूचवला जालीम उपाय
'त्या' 80 हजार कोटींवर कुणाचाच दावा नाही; Zerodha कंपनीने सूचवला जालीम उपाय
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 7:02 PM

नवी दिल्ली : अलीकडेच, ईपीएफओ(EPFO)ने सांगितले होते की पीएफ(PF) खात्यात सुमारे 26,497 कोटी रुपये जमा आहेत. ज्याचे कोणतेही दावेदार नाहीत आणि ही रक्कम हळूहळू वाढत आहे. त्याचप्रमाणे बँकेत अनेक मुदत ठेवी आहेत, ज्यांचे दावेदार मुदतपूर्तीनंतरही दिसत नाहीत. अशाप्रकारे, एकूण 80 हजार कोटी रुपयांहून अधिक पैसे विना क्लेम पडून आहेत. आता झीरोधा या ब्रोकिंग फर्मचे सहसंस्थापक नितीन कामत यांनी या समस्येवर उपाय सांगितला आहे. (No one is claiming Rs 80,000 crore; Zerodha company suggested a ruthless solution)

झीरोधाने सुरु केले अलर्ट फीचर

नितीन कामत म्हणाले की, अनेक लोकांचे नामनिर्देशित न केल्यामुळे, बँक, डिमॅट आणि इतर खात्यांमध्ये 80,000 कोटींपेक्षा जास्त पैसे विना क्लेम पडून आहेत. ही समस्या पाहता, झिरोधा(Zerodha)ने एक अलर्ट फीचर सुरू केले आहे, जे डिमॅट खाते सक्रिय नसल्यास नामांकित व्यक्तीला कळवेल. कामत यांनी आशा व्यक्त केली आहे की लवकरच बँका आणि इतर ऑनलाईन ब्रोकरेज कंपन्या देखील हे वैशिष्ट्य स्वीकारतील. जेणेकरून विना क्लेमवाल्या रकमेचा बंदोबस्त करता येईल.

झीरोधाने ग्राहकांना दिली विशेष सुविधा

वास्तविक, झिरोधाने आपल्या ग्राहकांना एक विशेष सुविधा दिली आहे की ज्या अंतर्गत खातेधारक त्यांच्या खात्यात ऑनलाईन नामांकित जोडू किंवा बदलू शकतात. एवढेच नाही तर जर एक वर्षापर्यंत व्यवहार न झाल्यामुळे डिमॅट खाते सक्रिय झाले नाही तर त्याची माहिती नामनिर्देशित व्यक्तीला एसएमएस किंवा ईमेल द्वारे दिली जाईल.

नितीन कामत यांचे म्हणणे आहे की हक्क न मिळालेल्या रकमेचा दावेदार न होण्याचे एक प्रमुख कारण हे असू शकते की नामनिर्देशित व्यक्तीला याची माहिती नसते. म्हणूनच झीरोधाने अलर्ट फीचर सुरू केले आहे, जेणेकरून अशा परिस्थितीत सर्व ग्राहकांच्या नामांकित लोकांपर्यंत माहिती पोहोचवता येईल. देशात हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ईपीएफओकडे सुमारे 26,497 कोटी रुपये, सर्व बँक खात्यांमध्ये 18,381 कोटी रुपये, म्युच्युअल फंडांमध्ये 17,880 कोटी रुपये आणि विमा कंपन्यांकडे 15,167 कोटी रुपये हक्कहीन आहेत. परिपक्व मुदत ठेवींमध्ये 4,820 कोटी रुपयांच्या विना क्लेम ठेवी जमा आहेत. (No one is claiming Rs 80,000 crore; Zerodha company suggested a ruthless solution)

इतर बातम्या

घटस्फोटानंतर शिखरची इन्स्टाग्रामवर भावूक स्टोरी, मुलाशी बोलताना धवनला काय वाटलं?

सौर पंप मिळवायचाय, कुसुम योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन, अर्ज कुठं करायचा वाचा सविस्तर

अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.