Richest Businessman : तुमचे सर्व अंदाज साफ चूक, हे होते जगातील सर्वात श्रीमंत व्यापारी

Richest Businessman : तुम्ही आयडियाची कल्पना लढवा, पण तुमचे सर्व अंदाज साफ चुकतील. जगातील सर्वात श्रीमंत व्यापारी कोण होते, माहिती आहे का?  त्यांनी इंग्रजांनाच काय औरंगजेबाला पण दिले होते कर्ज 

Richest Businessman : तुमचे सर्व अंदाज साफ चूक, हे होते जगातील सर्वात श्रीमंत व्यापारी
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 6:34 PM

नवी दिल्ली : भारताला उगीचच सोन्याची चिडिया म्हटलं जात नव्हतं. आपल्या देशात सोने-चांदीच नाही तर अशी सोन्या-चांदीसारखी अनेक रत्नं झाली आहेत. अनेक महामानव, महान व्यक्ती आपल्या देशात जन्मल्या. एका मोठ्या व्यापाऱ्याची किर्ती सुद्धा अशीच सातासमुद्रापार गेली होती. इंग्रज सुद्धा त्याचे कर्जदार होते. दक्षिणेतील मोहिमेत मराठ्यांनी जेरीस आणल्याने  तिजोरीत खडखडाट झाला तेव्हा मुघल बादशाह औरंगजेबाला या व्यापाराची मोठी आठवण झाली. जगातील सर्वात श्रीमंत व्यापारी (India’s Richest Businessman) कोण होता माहिती आहे का? 1617 ते 1670 या काळात ते ईस्ट इंडिया कंपनीचे फायनान्सर होते.

एकूण 8 दशलक्ष जगातील त्यावेळचे सर्वात श्रीमंत व्यक्ती वीरजी व्होरा होते. वीरजी यांचा जन्म 1590 मध्ये झाला होता. तर त्यांचे निधन 1670 मध्ये झाले होते. एका अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती 8 दशलक्ष रुपये होती. या हिशोबाने ते देशातीलच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत व्यापारी होते. इतिहासातील काही नोंदीनुसार, वीरजी व्होरा हे मिरे, सोने, विलायची आणि इतर वस्तूंचा व्यापार करायचे.

इंग्रजांसोबत करत होते व्यापार 1629 आणि 1668 यादरम्यान वीरजी व्होरा यांचा इंग्रजांशी जास्त संपर्क आला. त्यांनी इंग्रजासोबत जास्त व्यापार केला. त्यांचा व्यापार त्यामुळे अनेक पटीने वाढला. ते एखाद्या व्यापारात शिरले की तो संपूर्ण काबीज करत, इंग्रजांच्या उद्योगातील अनेक शेअर्स त्यांनी खरेदी केली होते.

हे सुद्धा वाचा

ईस्ट इंडिया कंपनीला मदत त्याकाळी 80 लाखांची आसामी असलेले वीरजी व्होरा यांच्याकडून इंग्रजांनी अनेकदा कर्ज घेतले होते. ईस्ट इंडिया कंपनीच नाही तर डच ईस्ट इंडिया कंपनी पण त्यांची कर्जदार होती. त्यांना युरोपियन व्यापारी मर्चंट प्रिन्स असे कौतुकाने म्हणत असत. ते एखाद्या व्यापारीतील सर्वच सर्व हिस्सा खरेदी करायचे आणि मोठा नफा कमावत ते विक्री करायचे.

औरंगजेबाने पण मागितली मदत व्यापारासोबतच वीरजी व्होरा हे एक सावकार पण होते. त्यांनी इंग्रजांना अनेकदा कर्ज दिले होते. त्याच्या जोरावर इंग्रजांना अनेक ठिकाणी उद्योगात झेप घेता आली. ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्याकडून कर्ज घेतले होते. दक्षिण भारत पादाक्रांत करण्यासाठी औरंगजेब मोहिमेवर निघाला. पण मराठ्यांनी त्याला जेरीस आणले. मराठ्यांसोबतच युद्धात औरंगजेबासमोर वित्तीय संकट आले. त्याने त्याच्या खास माणसांना वीरजी व्होरांकडे पाठवून उसणवारीवर पैसे मागितले. बादशाह शाहजहाला त्यांनी चार अरबी घोडे भेट दिले होते. ते त्याकाळचे सर्वात श्रींमत व्यापारी होते.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...