BDD Homes : आता मुंबईकरांना बीडीडी चाळीतही मिळणार घर; निधी उभारण्यासाठी म्हाडाचा उपक्रम

बीडीडी (BDD) चाळीच्या पुनर्विकासाचे काम सध्या म्हाडाच्या (MHADA) वतीने सुरू करण्यात आले आहे. मात्र बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी मोठ्याप्रमाणान निधीची (Funding) गरज आहे. हा निधी उभारण्यासाठी म्हाडाकडून विविध उपाय केले जात आहे.

BDD Homes : आता मुंबईकरांना बीडीडी चाळीतही मिळणार घर; निधी उभारण्यासाठी म्हाडाचा उपक्रम
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 1:20 PM

बीडीडी (BDD) चाळीच्या पुनर्विकासाचे काम सध्या म्हाडाच्या (MHADA) वतीने सुरू करण्यात आले आहे. मात्र बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी मोठ्याप्रमाणान निधीची (Funding) गरज आहे. हा निधी उभारण्यासाठी म्हाडाकडून विविध उपाय केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता म्हाडाने प्रकल्पाच्या तीनही ठिकाणी पुनर्वसन इमारतीसह विक्रीसाठीही घरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे आता मुंबईकरांना बीडीडी चाळीमध्ये देखील घरे उपलब्ध होणार असून, त्याबदल्यात म्हाडाला निधी मिळणार आहे. म्हाडाने यापूर्वी बीडीडी चाळीतील रहिवाशांचे प्रथम पुनर्वसन करून उपलब्ध जागेवर विक्रीसाठी घरे उभारण्याचा विचार केला होता. मात्र प्रकल्प वेळेत आणि विनाअडथळा पूर्ण होण्यासाठी म्हाडाने पुनर्वसन इमारतीबरोबरच विक्रिच्या इमरातचींचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

टप्प्याटप्प्याने घराची विक्री

नायगाव, वरळी, ना.म. जोशी मार्ग येथे टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी ही घरे उपलब्ध होणार आहेत. ही घरे सोडतीद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून त्याच्यामाध्यमातून भांडवल उपलब्ध करण्याचा म्हाडाच विचार आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. मात्र बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी मोठ्याप्रमाणान निधीची गरज आहे. हा निधी उभारण्यासाठी पुनर्वसन इमारतीसह विक्रीसाठीही घरे उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडाच्या वतीने देण्यात आली आहे.

पाचशे चौरस फुटाचे घर

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारने म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून निवड केली आहे. म्हाडाने नायगाव येथील बीबीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम एस अँड टी कंपनीला दिले आहे. नाम जोशी मार्गावरील काम शापूरजी अँड पालमजी तर वरळीमधील काम टाटा कंपनीला देण्यात आले आहे. या कंपन्यांनी अतिशय वेगाने कम सुरू केले आहे. या प्रकल्पांतर्गंत पाचशे चौरस फुटाचे घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Stock market updates : शेअर बाजारात पडझड, सेंसेक्स 1,100 अकांनी कोसळला, गुंतवणूकदारांना मोठा फटका

लवकरच ‘GST’च्या स्लॅबमध्ये बदलाची शक्यता; सर्वसामान्यांना बसणार आर्थिक फटका, ‘अशी’ असेल नवी रचना

जगभरात भाववाढीचा आगडोंब : भारतीयांच्या खिशावर भार, महागाईने अमेरिका-ब्रिटनसह उर्वरित देशही धास्तावले

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.