Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fuel : आता स्वस्तात मिळेल इंधन, शेतकऱ्यांनाही होणार मोठा फायदा, केंद्राची योजना तरी काय आहे..

Fuel : लवकरच इंधन स्वस्त होणार असल्याने तुम्हाला दुचाकी, चारचाकी दामटता येणार आहे..

Fuel : आता स्वस्तात मिळेल इंधन, शेतकऱ्यांनाही होणार मोठा फायदा, केंद्राची योजना तरी काय आहे..
आता मिळेल स्वस्त इंधनImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 7:48 PM

नवी दिल्ली : देशात लवकरच इंधन (Fuel) स्वस्त होणार आहे. त्यामुळे तुम्हाला दुचाकी, चारचाकी (Four Wheeler) दामटायला अडचण येणार नाही. आता तुम्ही म्हणाल हा चमत्कार होणार तरी कसा? केंद्र सरकारला (Central Government) तेलाची विहिर सापडली आहे की काय? तर तसे अजिबात नाही. सरकारला कोणी स्वस्तात इंधनही देत नाहीये. पण स्वस्त इंधनासाठी एक पर्याय शोधण्यात आला आहे.

पेट्रोल-डिझेलमुळे वायु प्रदूषण वाढत असल्याने त्यावर पर्याय शोधण्यात आला आहे. आता जैव इंधनाच्या वापरावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. त्यासाठी देशभरात केंद्र सरकारने इथेनॉल (Ethanol) प्लँट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरात केंद्र सरकारने जवळपास 199 इथेनॉल प्लँट टाकण्याची तयारी सुरु केली आहे. यातील काही प्रकल्पांनी गतीही पकडली आहे. अनेक राज्यात इथेनॉल प्रकल्पाची सुरुवात होत आहे. पेट्रोल-डिझेलमध्ये इथेनॉल टाकून त्याआधारे गाड्या चालविण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

आशियातील सर्वात मोठा इथेनॉल प्लँट उत्तरप्रदेशातील गोंडा येथे उभारण्यात आला आहे. या प्लँटमध्ये प्रत्येक दिवशी 350 किलोलिटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येत आहे. देशातील इतर प्रकल्पांमुळे येथील उत्पादन क्षमता कित्येक पटीने अधिक आहे.

इंधन किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी पेट्रोल-डिझेलमध्ये इथेनॉलचा वापर वाढविण्यावर जोर देण्यात येत आहे. इथेनॉल तयार करण्यासाठी ऊस आणि इतर पिकांचा मोठा वापर होतो. त्यामुळे कृषी जगताला त्याचा मोठा फायदा होणार आहे.

इथेनॉलचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना नगदी पीक घेतल्याने त्याचा फायदा होईल. इथेनॉलचे फायदे लक्षात घेता, सरकार त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढविण्यासाठी गतीने काम करत आहे.

गोंडा येथील इथेनॉल प्लँट हा जवळपास 65 एकरावर आहे. त्यासाठी 455.84 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या प्रकल्पामुळे गोंडाच्या आजुबाजूच्या 60 हजार शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

इथेनॉल प्लँटमध्ये ऊस, मक्का, तांदळाचा आणि इतर धान्यांचा वापर होतो. तसेच खाद्यानाचा ही वापर करण्यात येतो. इथेनॉल या जैविक इंधनाचे पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिश्रण करुन ते विक्री करण्यात येणार आहे.

2030 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉलचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. 2022 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईंधनात 10 टक्के इथेनॉलचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 10 टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोल-डिझेलची विक्री करण्यात येत आहे.

'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.