आता ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन केंद्राचा काळा बाजार थांबणार, केवळ एमआरपीमध्ये होणार विक्री

मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायजर डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग ऑथोरिटीने (NPPI) जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 31 मार्च 2020 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या संदर्भात ही नवीनतम अधिसूचना आहे. (Now the black market of oximeters and oxygen centers will stop, sales will be in MRP only)

आता ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन केंद्राचा काळा बाजार थांबणार, केवळ एमआरपीमध्ये होणार विक्री
आता ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन केंद्राचा काळा बाजार थांबणार
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 2:56 PM

नवी दिल्ली : ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन केंद्राची वाढती मागणी आणि त्याचा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने नोटीस बजावली आहे. या सूचनेनुसार, ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन केंद्राची किंमत 1 वर्षात 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकत नाही. याबरोबरच सरकारने कंपन्यांनाकडे त्यांचा एमआरपी(Maximum retail price)चा तपशील मागितला आहे. (Now the black market of oximeters and oxygen centers will stop, sales will be in MRP only)

मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायजर डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्स आणि नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग ऑथोरिटीने (NPPI) जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 31 मार्च 2020 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या संदर्भात ही नवीनतम अधिसूचना आहे. याअंतर्गत, वैद्यकीय उपकरणांची जास्तीत जास्त किरकोळ किंमत एका वर्षात 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढविली जाऊ शकत नाही.

22 मे पर्यंत शेअर करायची आहे माहिती

सरकारने सर्व उत्पादक आणि इंपोर्टर्सना या दोन वैद्यकीय उपकरणांसाठी एमआरपी सादर करण्यास सांगितले आहे. त्यांना पुढील सात दिवसांत ही माहिती शेअर करावी लागेल. त्याची अंतिम मुदत 22 मे 2021 पर्यंत आहे.

अशाच प्रकारे मास्क आणि सॅनिटायझरची किंमत नियंत्रित केली

मार्च 2020 मध्ये जेव्हा कोरोनाने सर्वप्रथम भारतात दरवाजा ठोठावला, तेव्हा मास्क आणि हँड सॅनिटायजरच्या किमती गगनाला भिडल्या. त्यावेळी मिनिस्ट्री ऑफ कंज्युमर अफेअर्सने त्याच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी अधिसूचना जारी केली. त्याअंतर्गत सरकारने देशातील सॅनिटायझर्स आणि मास्क यांचे किरकोळ दर निश्चित केले होते. ही दोन्ही उत्पादने निश्चित किंमतीपेक्षा अधिक विकता येत नव्हते. सरकारच्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी झाली आणि दोघांच्या किंमती नियंत्रणात आल्या.

ही माहिती शेअर करावी लागेल

ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन केंद्राची एमआरपी उत्पादक आणि इंपोर्टर्सना एका विशेष फॉर्मेटमध्ये द्यावी लागेल. यामध्ये ब्रँड नेम, सर्टिफिकेशनचा प्रकार, युनिट ऑफ सेल्स, डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट, हॉस्पिटलसाठी त्याची किंमत, किरकोळ किंमत, जीएसटी, मुव्हिंग वार्षिक उलाढाल, 1 मे रोजी जास्तीत जास्त किरकोळ किंमत यासारखी माहिती शेअर करावी लागेल.

सध्या कोरोनाची परिस्थिती कशी?

गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचा वेग थोडा कमी झाला आहे, परंतु अद्याप जवळ जवळ 3.20 केसेस आहेत. कोविड ट्रॅकरच्या मते, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 36.13 लाख आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 270321 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा डेटा 16 मे रोजी सकाळी 8.12 पर्यंत आहे. पुष्टी झालेल्या प्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यानंतर कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूचा नंबर येतो. तथापि, सक्रिय प्रकरणांच्या आधारे कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर महाराष्ट्र व त्यानंतर केरळचा क्रमांक येतो. (Now the black market of oximeters and oxygen centers will stop, sales will be in MRP only)

इतर बातम्या

Benefits of Nutmeg Oil : जायफळचे तेल अनेक रोगांवर गुणकारी, वाचा याबद्दल अधिक !

“लसीकरण परिस्थिती अरेंज मॅरेजसारखी, आधी तुम्ही तयार नसता, अखेर कुठलीच मिळत नाही”

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.