Economy : जे बात, आता लक्ष्य तिसरी महासत्ता, जपानला ही टाकणार भारत मागे.. या जागतिक संस्थेला विश्वास..

Economy : जगावर मंदीचे सावट असताना भारतीय अर्थव्यवस्था काही थांबायचं नाव घेत नाहीये..

Economy : जे बात, आता लक्ष्य तिसरी महासत्ता, जपानला ही टाकणार भारत मागे.. या जागतिक संस्थेला विश्वास..
तिसरी महासत्ताImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 7:43 PM

नवी दिल्ली : द ग्रेट ब्रिटेनला (Britain) बाहेरचा रस्ता दाखवत भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत (World Economy) पाचवे स्थान पटकावलं ही बातमी काही अगदीच जूनी झाली नाही. सध्याच्या विकास दराचा (Growth Rate) विचार करता भारत लवकरच जर्मनी (Germany) आणि जपानला (Japan) मागे टाकणार असा दावा करण्यात येत आहे. हा दावा भारतीय संस्थेने नाही तर जागतिक पातळीवरील मोठ्या संस्थेने केल्याने सर्वच देशांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत.

भारत 2027 मध्ये जर्मनी आणि 2029 मध्ये जापानच्याही पुढे निघून जाईल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) वर्तविला आहे. जपान सध्या जगातील तिसरी आर्थिक महासत्ता आहे. जपानला मागे टाकत भारत येत्या पाच वर्षांत तिसरी आर्थिक महासत्ता होईल असा दावा नाणेनिधीने केला आहे.

भारतीय स्टेट बँकेच्या रिसर्चनुसार, यावर्षाच्या तिमाहीत विकास दर 13.5% टक्के राहिला आहे. या दराच्याआधारे भारत या आर्थिक वर्षात सर्वात गतीने वाढणारी अर्थव्यवस्था असेल. पूर्व मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद विरमानी यांनीही या विकास दरावर शिक्कामोर्तब केले आहे.

हे सुद्धा वाचा

विकसीत जगतावर सध्या रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या विकसीत राष्ट्रांवर मंदीचे सावट असून अनेक देशात महागाईने उच्चांक मोडीत काढले आहेत.अशा काळातही भारतीय अर्थव्यवस्था मात्र गतीने पुढे सरकत आहे.

IMF ने जगातील अनेक अर्थव्यवस्थांचा विकास दर (Economic Growth Rate Projection) कमी केलेला आहे.पण भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) संकटांचा सामना करताना 6.8 टक्क्यांचे लक्ष्य सहज गाठले असा विश्वास IMF ला वाटत आहे. सध्याचा भारताचा विकास दर चीनपेक्षा जास्त आहे.

भारताची गती पाहता 2028-30 पर्यंत भारत जगात तिसरी आर्थिक महासत्ता होईल, असा कयासच नाही तर दावा करण्यात येत आहे. 2014 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था दहाव्या स्थानी होती. IMF च्या दाव्यानुसार, भारतीय अर्थव्यवस्था 2025-26 मध्ये जर्मनी इतकी मोठी होईल आणि तिला ही मागे टाकेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.