NPS पेन्शन स्कीमच्या गुंतवणुकदारांसाठी महत्वाची बातमी; प्लान न घेताच 5 लाख काढता येणार

NPS pension scheme | पेन्शन फंड रेग्युलेटर अँण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार मुदतीपूर्वी पैसे काढून घेण्याची मर्यादा एक लाखावरुन 2.5 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

NPS पेन्शन स्कीमच्या गुंतवणुकदारांसाठी महत्वाची बातमी; प्लान न घेताच 5 लाख काढता येणार
पेन्शन स्कीम
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 11:33 AM

मुंबई: सरकारी पेन्शन स्कीम अर्थात NPS मधील गुंतवणुकदारांच्यादृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पेन्शन फंड रेग्युलेटर अँण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्याच्या पेन्शन फंडात 5 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असेल तर कोणताही प्लॅन खरेदी न करता हे पैसे काढता येणार आहेत. सध्याच्या नियमानुसार NPS च्या ग्राहकांना 60व्या वर्षी निवृत्तीवेळी फंडात दोन लाख रुपयांची रक्कम असेल तर विमा कंपनीची योजना घ्यावी लागत होती. तर 60 टक्के रक्कम ग्राहकांना काढून घेता येत होती. (NPS Pension scheme pfrda permits withdrawal of pension corpus of rs 5 lakh without buying annuity)

मात्र, पेन्शन फंड रेग्युलेटर अँण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार मुदतीपूर्वी पैसे काढून घेण्याची मर्यादा एक लाखावरुन 2.5 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. तसेच NPS मध्ये प्रवेश करण्याची कमाल वयोमर्यादा 65 वर्षावरून 70 इतकी करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने 2004 साली एनपीएस योजना सुरु केली होती. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली होती. कोरोनाकाळात पेन्शनधारकांना पैसे काढण्यासाठी कोणतीही कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही. डिजिटल पद्धतीने हा संपूर्ण व्यवहार पार पाडता येईल.

करातही सवलत

जास्त नफा मिळण्याबरोबरच आता एनपीएस अंतर्गत अधिक कर बचत होईल. पीएफआरडीएने सरकारला दिलेल्या सूचनेनुसार, एनपीएसमध्ये गुंतवणूक करून कर बचतीच्या रकमेची मर्यादा सध्याच्या 50,000 रुपयांवरून वाढवून 1 लाखापर्यंत केली पाहिजे. ही मर्यादा दुप्पट झाल्यास कर बचतीत गुंतवणूकदारांनाही बराच फायदा होईल. येत्या काही दिवसात याबाबतची नवी अधिसूचना जारी केली जाईल, असे नियामकाचे म्हणणं आहे. लवकरच ही नवीन यंत्रणा कार्यान्वित होईल, असे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या:

पेन्शन स्कीममध्ये पैसे गुंतवताय; मोदी सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

NPS योजनेत आता मिळणार जास्त नफा, पैसे काढण्याच्या नियमातही बदल होणार

तुमचं NPS अकाऊंट आहे? NPS चं महत्त्व आणि फायदे जाणून घ्या!

(NPS Pension scheme pfrda permits withdrawal of pension corpus of rs 5 lakh without buying annuity)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.