Bonus Share : 1 शेअरवर 5 शेअरची लॉटरी, गुंतवणूकदारांची चांदीच चांदी

Bonus Share : या कंपनीच्या शेअरधारकांना एकदम लॉटरी लागली आहे. गुंतवणूकदारांची चांदीच चांदी झाली आहे.

Bonus Share : 1 शेअरवर 5 शेअरची लॉटरी, गुंतवणूकदारांची चांदीच चांदी
नायकाचा धुमाकूळImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 2:48 PM

नवी दिल्ली : या कंपनीच्या शेअरधारकांना (Shareholders) एकदम लॉटरी लागली आहे. कंपनी 1 शेअरवर 5 शेअर बोनस (Bonus Share) म्हणून देणार आहे. त्यामुळे दिवाळीदरम्यान मिळालेल्या बोनसचा आनंद संपतो न संपतो तोच पुन्हा गुंतवणुकीतून हा बोनस मिळाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार (Investors) खूष झाले आहेत.

लाईफस्टाईल रिटेल कंपनी FSN E-Commerce Ventures Limited ही ती कंपनी आहे. गुंतवणूकदार वगळता इतरांना हे नाव परिचित नाही. आता Nykaa हे नाव सांगितलं तर तुम्हाला कंपनीची ओळख नक्की पटेल नाही का?

तर Nykaa ने गुंतवणूकदारांसाठी 1 शेअरवर 5 शेअर बोनस देण्याची घोषणा करुन बाजारात धुमाकूळ घातला आहे. अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल येत असताना ही बातमी येऊन धडकल्याने इतर कंपन्यांवरही त्याचा परिणाम दिसून येणार आहे.

हे सुद्धा वाचा

हा बोनस शेअर 3 नोव्हेंबर 2022 रोजी देण्याचे घोषित झाले होते. पण नंतर ही तारीख एक आठवड्यांनी वाढवण्यात आली. 11 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणूकदारांना Nykaa share मिळतील.

लाईफस्टाईल रिटेल प्लॅटफॉर्म नायकाने त्यांच्या गुंतवणूकदारांना 5:1 या प्रमाणात हा शेअर देण्यात येणार आहे. म्हणजेच प्रत्येक शेअरवर बोनस म्हणून 5 शेअर्स देण्यात येईल. कंपनीने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

नायका कंपनीला जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जोरदार फायदा झाला आहे. या तिमाहीत कंपनीला एकूण 5.2 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 1 कोटींचा नफा झाला होता.

कंपनीची गेल्या वर्षीची कामगिरी जोरदार राहिली आहे. त्याचा परिणाम दिसून आला. आकड्यांचे गणित पाहता कंपनीला एकाच वर्षात 330% टक्के नफा झाला आहे. या जून तिमाहीतही कंपनीचा निव्वळ नफा 5 कोटी रुपये होता.

HSBC ब्रोकरेजने या कंपनीच्या स्टाकची टार्गेट प्राईस 2,170 रुपये ठेवली आहे. परदेशी ब्रोकरेज फर्म हाउस जेफरीज यांनी या स्टॉकसाठी 1650 रुपये टार्गेट प्राईस ठेवली आहे. अनेक ब्रोकर फर्म या शेअरवर सध्या फिदा आहेत.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.