AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Holidays : या महिन्यांत सुट्यांचा सुकाळ, सणासुदीत बँकांचे इतक्या दिवस शटर डाऊन..

Bank Holidays : या ऑक्टोबर महिन्यात सुट्यांचा सुकाळ आहे, इतक्या दिवस बँका बंद राहणार असल्याने तुमचे काम लवकर पूर्ण करा .

Bank Holidays : या महिन्यांत सुट्यांचा सुकाळ, सणासुदीत बँकांचे इतक्या दिवस शटर डाऊन..
सुट्यांचा सुकाळImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 01, 2022 | 8:03 PM
Share

नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात (October) अनेक दिवस बँका बंद (Bank Holiday) राहतील. हा सणासुदीचा आणि धामधुमीचा महिना असल्याने ऑक्टोबर महिन्यात एकूण 21 दिवस बँकांचे कामकाज प्रभावित राहणार आहे.

पण याचा अर्थ संपूर्ण देशभर एकाच दिवशी बँकांचे कामकाज प्रभावित होईल असे नाही. काही राज्यात ज्या दिवशी बँका बंद असतील, इतर राज्यात मात्र त्यादिवशी कामकाज सुरु असेल. त्या त्या राजातील सण आणि स्थानिक सुट्यांच्या आधारे बँकांच्या कामकाजात फरक दिसून येईल.

दरवर्षी RBI बँकांना सुट्टी जाहीर करते. पण देशातील सर्वच राज्यातील बँकांना एकाच दिवशी सुट्या नसतात. राज्यानुसार आणि स्थानिक सुट्यांनुसार त्यात बदल होतो. पण मोठ्या सणाला, राष्ट्रीय सणाला मात्र सर्वच बँकांना सुट्टी असते.

या ऑक्टोबर महिन्यात 3, 4, 5, 6, 7, 8, 13, 14, 18, 24, 25 ,26, 27 आणि 31 ऑक्टोबर रोजी निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अॅक्टतंर्गत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना वेळतच त्यांची बँकेतील कामे पूर्ण करावी लागतील.

Bank Holidays in October: ऑक्टोबर 2022 मधील सुट्यांची यादी

1 ऑक्टोबर – बँकांमध्ये खाते परीक्षण, हाफ इयरली क्लोजिंग सुट्टी 2 ऑक्टोबर – गांधी जयंती, रविवार (साप्ताहिक सुट्टी) 3 ऑक्टोबर- दुर्गा पूजा (महाअष्टमी) 4 ऑक्टोबर- दुर्गा पूजा (महानवमी)/आयुध पूजा/श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव 5 ऑक्टोबर- दसरा (विजय दशमी)/श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव 6 ऑक्टोबर- दुर्गा पूजा 7 ऑक्टोबर- दुर्गा पूजा 8 ऑक्टोबर- मिलाद-ए-शरीफ/ईद-ए-मिलाद-उल-नबी (दुसरा शनिवार-सुट्टी) 9 ऑक्टोबर- रविवार (साप्ताहिक सु्ट्टी) 13 ऑक्टोबर- करवा चौथ 14 ऑक्टोबर- ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतरचा शुक्रवार 16 ऑक्टोबर- रविवार (साप्ताहिक सु्ट्टी) 18 ऑक्टोबर- काति बिहू 22 ऑक्टोबर- चौथा शनिवार (सुट्टी) 23 ऑक्टोबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी) 24 ऑक्टोबर- काली पूजा/दीपावली/दीवाळी (लक्ष्मी पूजा)/नरक चतुर्दशी 25 ऑक्टोबर- लक्ष्मी पूजा/दीपावली/गोवर्धन पूजा 26 ऑक्टोबर- गोवर्धन पूजा/विक्रम संवत नववर्ष दिवस/ बळी प्रतिपदा 27 ऑक्टोबर- भाईदूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा/दीपावली 30 ऑक्टोबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी) 31 ऑक्टोबर- सरदार वल्लभभाई पटेल जन्मदिवस

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.