Petrol Diesel Rate Today : तेल कंपन्यांची चांदी, सरकार फायद्यात, तुम्ही खरेदी करा पेट्रोल-डिझेल महागात

Petrol Diesel Rate Today : गेल्या 14 महिन्यात रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करुन भारतीय रिफाईन कंपन्यांना बंपर फायदा झाला आहे. इतकी कमाई या कंपन्यांनी केली. पण सर्वसामान्यांच्या खिशावर आजही कंपन्या दरोडा घालत आहेत.

Petrol Diesel Rate Today : तेल कंपन्यांची चांदी, सरकार फायद्यात, तुम्ही खरेदी करा पेट्रोल-डिझेल महागात
पेट्रोल-डिझेलचा भाव काय
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 8:34 AM

नवी दिल्ली : युक्रेन युद्धानंतर रशियाने भारताला मोठे सहकार्य केले. स्वस्तात कच्चा तेलाची (Crude Oil) भारताला विक्री केली. भारतीय तेल कंपन्यांनी कच्चा तेलावर प्रक्रिया करुन ते युरोपला विकले. स्वस्तात कच्चे तेल मिळाल्याने कंपन्यांना फायदा झाला. युरोपात तेल विक्रीतून कमाई झाली. तर भारतीय बाजारात गेल्या वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) गगनाला भिडला आहे. म्हणजे तेल उत्पादक कंपन्यांना कच्चा तेलावर वर्षभरात तिप्पट नफा कमावत आहेत. तर केंद्रासह राज्य सरकार आव्वाच्या सव्वा शुल्क आकारुन मालामाल झाले आहेत. सर्वसामान्यांच्या खिशावर मात्र वर्षभरापासून रोज दरोडा घालण्यात येत आहे. त्यांना कसलाच फायदा झाला नाही. पेट्रोल-डिझेल महागड्या दरानेच त्यांना खरेदी करावे लागत आहे.

कमाईच कमाई युक्रेन युद्धानंतर भारतीय तेल कंपन्यांना मोठा फायदा झाला. मे 2023 पर्यंत या कंपन्यांनी कमीत कमी 7.17 अब्ज डॉलरची बचत केली आहे. ही बचत म्हणजे कमाईच केली आहे. इंडियन एक्सप्रेसने भारतीय कॉमर्स मंत्रालयाच्या रिपोर्टआधारे ही आकडेवारी दिली आहे. रिपोर्टमध्ये गेल्या 14 महिन्यांतील डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे.

कच्चा तेलात वाढ आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात आज पुन्हा वाढ झाली. 7 जुलै रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 76.54 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 71.83 डॉलर प्रति बॅरल झाला. गेल्यावर्षीपेक्षा हे भाव कमी आहेत.

हे सुद्धा वाचा

कच्चा तेलाचा भडका रशिया-युक्रेन युद्ध गेल्यावर्षी भडकले. मार्च 2022 मध्ये कच्चे तेलाचे भाव गगनाला भिडले.. किंमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहचल्या होत्या. नवीन वर्षात, 2023 मध्ये कच्चा तेलाने मोठी उसळी घेतली नाही. भाव एकदाच 90 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचले. पण अनेक महिने किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या आत आहेत.

सकाळीच भाव अपडेट भारतीय तेल कंपन्यांनी सकाळीच पेट्रोल-डिझेलचा भाव अपडेट केले आहे. सकाळी 6 वाजता इंधनाच्या किंमती जाहीर केल्या आहेत. कंपन्या दररोज इंधनाचे दर जाहीर करतात. जून 2017 पूर्वी 15 दिवसांनी इंधनाच्या किंमती अपडेट करण्यात येत होत्या. हे भाव पुढील 15 दिवसांसाठी कायम राहत असत.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 93.27 रुपये प्रति लिटर आहे
  • अहमदनगर पेट्रोल 106.53 तर डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर
  • अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  • अमरावतीत पेट्रोल 107.23 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद 106.75 पेट्रोल आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर
  • जळगावमध्ये पेट्रोल 107.19 आणि डिझेल 93.70 रुपये प्रति लिटर
  • कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
  • नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
  • नाशिकमध्ये पेट्रोल 105.89 रुपये आणि डिझेल 92.42 रुपये प्रति लिटर
  • परभणी पेट्रोल 108.79 तर डिझेल 95.21रुपये प्रति लिटर
  • पुण्यात पेट्रोलचा भाव 105.77 आणि डिझेल 92.30 रुपये प्रति लिटर
  • रायगड पेट्रोलचा भाव 105.80 आणि डिझेल 92.30 रुपये प्रति लिटर
  • सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.99 रुपये तर डिझेल 93.49 रुपये प्रति लिटर
  • ठाणे पेट्रोलचा दर 105.97 रुपये तर डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.