Online Game : क्रिकेट असो वा रमी, ऑनलाईन गेमिंग करणार खिसा खाली, आता द्यावा लागेल तगडा टॅक्स!

Online Game : ऑनलाईन गेमिंगवर आता जादा रक्कम मोजावी लागू शकते..

Online Game : क्रिकेट असो वा रमी, ऑनलाईन गेमिंग करणार खिसा खाली, आता द्यावा लागेल तगडा टॅक्स!
ऑनलाईन गेमिंगवर कर मोजाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 6:25 PM

नवी दिल्ली : ऑनलाईन गेमिंग (Online Gaming) आणि कॅसिनोसाठी (Casino) आता तुम्हाला अधिक रक्कम मोजावी लागू शकते. मोबाईलवर हे गेम खेळण्याचे फॅड अशात जास्त वाढलं आहे. केंद्र सरकार (Central Government) ऑनलाईन गेमिंग आणि कॅसिनोवर जास्त कर लावण्याच्या विचारात आहे. याविषयी गठित मंत्र्यांच्या समितीने (GOM) गुरुवारी त्यांचा अहवाल अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांना दिला. या समितीची स्थापना GST परिषदेने केली आहे. सीतारमण यांच्या अध्यक्षतेखालील वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या उद्या, 17 डिसेंबर रोजी होत असलेल्या बैठकीत याविषयीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मंत्री समूहाचे (GOM) अध्यक्ष आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी ट्विटरवर याविषयीची माहिती दिली. ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि घोडे सवारीवरील कराबाबत दुसरा अहवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना सोपविल्याचे ट्विट त्यांनी केले.

जीएसटी परिषद कोणताही मसुदा केंद्रीय मंत्रालयाकडे सादर करण्यावेळी परिषदेच्या सदस्यांना माहिती देते. परिषदेच्या बैठकीत आतापर्यंत ऑनलाईन गेमिंगवर कुठलीही चर्चा झाली नव्हती. पण आता याविषयी केंद्र सरकारही गंभीर झाले आहे.

हे सुद्धा वाचा

जीएसटी परिषदेला मंत्री समूहाने अहवाल सादर केला आहे. त्यामुळे त्याविषयी परिषदेला विचार करावा लागणार आहे. निर्णय जाहीर करावा लागणार आहे. GOM ने नोव्हेंबर महिन्यातील बैठकीत ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि घोडे सवारी वर 28 टक्के वस्तू आणि सेवा कर, जीएसटी लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

अर्थात अजून ही गोष्ट स्पष्ट करण्यात आली नाही की, जीएसटी हा केवळ ऑनलाईन गेमिंग पोर्टलवर लावण्यात येईल की गेम खेळणाऱ्यांनाही त्याची झळ बसेल. या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांच्या एकूण रक्कमेवर जीएसटी आकारण्यात येण्याची शक्यता आहे.

सध्या ऑनलाईन गेमिंगवर 18 टक्के जीएसटी लावण्यात येतो. गेमिंगच्या एकूण उत्पन्नावर हा कर लावण्यात येतो. ऑनलाईन गेमिंग पोर्टलवर सध्या हा कर लावण्यात येतो.आता नवीन प्रस्तावात पोर्टलवर कराचा भार पडणार की स्वतंत्रपणे सदस्यांवरही कर लावण्यात येणार हे लवकरच स्पष्ट होईल.

जागतिक बाजारात ऑनलाईन गेमिंगची कोट्यवधींची उलाढाल होते. 2019 मध्ये ही उलाढाल 37.65 दशलक्ष डॉलर होती. तर 2025 मध्ये 122.05 दशलक्ष अमेरिकन डॉलरपर्यंत ही उलाढाल होण्याची शक्यता आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.