Online Gaming GST : ऑनलाईन गेमिंग वाढीव कराच्या कचाट्यात, तुमचा खिसा इतका कापल्या जाणार

Online Gaming GST : तुमच्या ऑनलाईन गेमिंगवर केंद्र सरकारने कमाईची खेळी खेळली आहे. जीएसटी न्यायाधिकरण स्थापण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम होणार आहे.

Online Gaming GST : ऑनलाईन गेमिंग वाढीव कराच्या कचाट्यात, तुमचा खिसा इतका कापल्या जाणार
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 10:00 AM

नवी दिल्ली : ऑनलाईन गेमिंगची (Online Gaming) व्यसन म्हणा, आवड म्हणा, सवड म्हणा अथवा सवय असू द्या. तुमचा खिसा कापल्या जाणार आहे. तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात ऑनलाईन गेमिंकडे वळला आहे. तर या छंदातून केंद्र सरकारने (Central Government) कमाईची खेळी खेळली आहे. केंद्र गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन गेमिंगला वाढीव कराच्या कचाट्यात आणू पाहत होते. शेवटी एकदाचे त्यावर शिक्कामोर्तब झाले. ऑनलाईन गेमिंगवर कर, जीएसटी लावण्यात आला आहे. आता 28 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. पूर्वी 18 टक्के जीएसटी होता. तर जीएसटी न्यायाधिकरण स्थापण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या निर्णयाचा तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम होणार आहे.

राज्यांनी केली होती शिफारस राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या समितीने (GoM) ऑनलाईन गेमिंगवर (GST Tax on Online Gaming) करात वाढ करुन तो 28 टक्के करण्याची शिफारस केली होती. पण त्यावर निर्णय घ्यायला सहा महिने लागले. आता 28 टक्के जीएसटी वसूल होत असल्याने केंद्र सरकारच्या तिजोरीत मोठी गंगाजळी येईल. तर ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांचा खिसा कापल्या जाणार आहे.

गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोवर 28 टक्के जीएसटी गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोवर या निर्णयामुळे 28 टक्के जीएसटी जमा करावा लागेल. गेम ऑफ स्किल आणि गेम ऑफ चान्स असा कोणताही भेदभाव न करता सलग फेस व्हॅल्यूवर जीएसटी द्यावा लागेल. तर वाहनांच्या नोंदणीवर जीएसटी शेअर कंझ्युमर स्टेटला पण देण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

करदात्यांना दाद मागता येणार अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची 50 वी बैठक नवी दिल्लीत झाली. चार महत्वाचे निर्णय यावेळी झाले. जीएसटी न्यायाधीकरणाची (GST Tribunal) स्थापना करण्यात आली. करदात्यांना यामुळे वाद, सेवेतील त्रुटीसाठी थेट धाव घेता येईल. येत्या सहा महिन्यांत न्यायाधीकरणाचे कामकाज सुरु होणार आहे.

कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा कर्करोग (Cancer Patients) रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना उपचारासाठी आयात केलेल्या औषधांवर कुठल्याही प्रकारचा जीएसटी द्यावा लागणार नाही. परिषदेच्या या निर्णयामुळे कँसरवरील औषध Dinutuximab आता स्वस्तात आयात करता येईल. सध्या यावर 12 टक्के IGST द्यावा लागत आहे. तो आता शून्यावर आला आहे. या औषधाचा एका डोस 63 लाख रुपयांचा आहे.

फूड होणार स्वस्त सिनेमा हॉलमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. पूर्वी या पेय-पदार्थांवर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. कालच्या निर्णयामुळे आता 5 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे फूड स्वस्त होईल. ग्राहकांच्या खिसावरील भार हलका झाला आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.