अचानक पैशांची गरज आहे तर SBI करेल मदत, जाणून घ्या काय आहे खास योजना?
कोणतीही मदत न मिळाल्यास, अनेकदा लोक क्रेडिट कार्डची मदत घेतात किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करतात. पण वैयक्तिक कर्जात व्याज दर खूप जास्त आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एसबीआय ओव्हरड्राफ्टच्या खास वैशिष्ट्याबद्दल सांगणार आहोत.
मुंबई : कधीकधी अचानक पैशांची गरज भासते आणि अशा वेळी पैसे येण्याचे सगळे मार्ग बंद असले तर मोठं आर्थिक संकट ओढावतं. पण या परिस्थितीवर एक बँक ग्राहकांच्या कायम सोबत आहे. कोणतीही मदत न मिळाल्यास, अनेकदा लोक क्रेडिट कार्डची मदत घेतात किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करतात. पण वैयक्तिक कर्जात व्याज दर खूप जास्त आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एसबीआय ओव्हरड्राफ्टच्या खास वैशिष्ट्याबद्दल सांगणार आहोत. (online sbi bank how can i apply for overdraft in sbi can i withdraw from sbi od account know here)
ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय – महत्त्वाचं म्हणजे देशातल्या सगळ्या बँका ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. सरकारी आणि खासगी बँकादेखील ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. अनेक बँका चालू खातं, पगार खातं आणि मुदत ठेव (एफडी) वर ही सुविधा देतात. काही बँका समभाग, बाँड आणि विमा पॉलिसी सारख्या मालमत्तांच्या बदल्यात ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात. या सुविधेअंतर्गत तुम्ही बँकेकडून तुम्हाला आवश्यक ते पैसे घेऊ शकता आणि नंतर ती रक्कम कर्जाच्या स्वरुपात परत करू शकता.
SBI मध्ये कोणाला मिळते ओव्हरड्राफ्ट सुविधा?
SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पगाराच्या खात्यात नियमित पगार जमा होत असेल तर ग्राहक ओव्हरड्राफ्ट सुविधा वापरू शकतो. ओव्हरड्राफ्ट सर्व्हिसेसचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेत अर्ज करावा लागेल. बँकेच्या अॅपमध्ये ही सुविधा दिली जाते. जर बँकेत एफडी नसेल तर त्यासाठी आधी तुम्हाला बँकेत असलेल्या कोणत्याही मालमत्तेची तारण ठेवावी लागेल. यानंतर, अटी पूर्ण करताच बँका तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधा देते.
ओव्हरड्राफ्टमध्ये किती पैसे घेऊ शकते?
ओव्हरड्राफ्ट अंतर्गत तुम्ही किती पैसे घेऊ शकता याबाबत बँक निर्णय घेईल. हे तुमच्या उत्त्पन्नावरही अवलंबून आहे. वेतन आणि एफडीच्या बाबतीत बँकेच्या मर्यादा अधिक आहेत. सध्या अनेक बँका त्यांच्या चांगल्या ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा आधीच देते. त्यामुळे कर्ज घेणं सोपं जातं.
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बँकेत तुमच्याकडे 2 लाख रुपयांची एफडी असेल तर बँक ओव्हरड्राफ्टसाठी 1.60 लाख रुपये 80 %) मर्यादा निश्चित करू शकते. शेअर आणि डिबेंचर्सच्या बाबतीत ही मर्यादा 40 ते 70 टक्के असू शकते.
ओव्हरड्राफ्टबाबत महत्त्वाच्या गोष्टी
– घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी कालावधी दिला जाईल. वेळेत कर्ज नाही परत केले तर त्यासाठी दंडही आकारला जाईल.
– EMI देण्याच्याही काही मर्यादा नाही आहेत. तुम्ही कधीही संपूर्ण रक्कम बँकेला परत करू शकता.
– जॉईंट अकाऊंट असणारेही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. (online sbi bank how can i apply for overdraft in sbi can i withdraw from sbi od account know here)
संबंधित बातम्या –
RBI ची मोठी कारवाई, या बँकेला ठोठावला 2 कोटींचा दंड, तुमच्या पैशांवर परिणाम
Budget 2021: करदात्यांना झटका बसण्याची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून कररचनेत बदल होणार?
सौदी अरेबियाचा पेट्रोल डिझेलबाबत मोठा निर्णय, भारताची नाराजी, ‘हा’ परिणाम होणार
(online sbi bank how can i apply for overdraft in sbi can i withdraw from sbi od account know here)