कोट्यवधीचा मालक, ऑफिसमध्ये पोहचण्यासाठी लोकलचा प्रवास

Billionaire local train | 73 वर्षातही उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी एक आदर्श सर्वांसमोर ठेवला. त्यांनी मुंबईत लोकलने प्रवास केला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा श्रीमंतांनी वापर करण्याचे उदाहरण तसे निराळेच आहे. त्यांचा या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर युझर्सनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केला आहे.

कोट्यवधीचा मालक, ऑफिसमध्ये पोहचण्यासाठी लोकलचा प्रवास
Follow us
| Updated on: Dec 31, 2023 | 4:17 PM

मुंबई | 31 डिसेंबर 2023 : श्रीमंत वर्ग सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा फार कमी वापर करतो. अब्जाधीश सोडा लक्षाधीश पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना फारसे दिसत नाही. कार्यालयात अथवा बाजारात जाण्यासाठी त्यांच्या दिमतीला आलिशान कार असतात. पण उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी हा समज खोटा ठरवला. वयाच्या 73 वर्षात त्यांनी मुंबईत लोकलने प्रवास केला. ते 12000 कोटींचे मालक आहेत. त्यांच्याकडे महागड्या कारचा ताफा आहे. मुंबईतील अतिश्रीमंतात त्यांची गणना होते. पण त्यांनी लोकलने प्रवास करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या या लोकल प्रवासाचे कारण तरी काय?

लोकल ट्रेनने प्रवास

महानगरात वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. ट्रॅफिक जॅममध्ये कित्येकदा एक एक तास अडकून पडावे लागते. किंमती वेळ प्रवासातच वाया जातो. प्रदुषण वाढते. वाहतूक व्यवस्थेचा बोजावारा उडतो. त्यामुळे मोठ्या शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचा सल्ला राज्य सरकार देते. कार शेअरिंग, कार पुलिंग अशा संकल्पना पण समोर आल्या आहेत. पण अनेक जण मोठ्या शहरात स्वतःच्या वाहनाने जाणे पसंत करतात. पण 73 वर्षाचे निरंजन हिरानंदानी यांनी वेगळा आदर्श घालून दिला. त्यांनी लोकलने प्रवास करुन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विश्वास दाखवला.

हे सुद्धा वाचा

सांगितले हे कारण

या व्हिडिओत निरंजन हिरानंदानी हे प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहत असताना दिसतात. ते एसी कोचमध्ये शिरतात. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर रेल्वे स्टेशनवर त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. हिरानंदानी यांनी वेळ वाचावा आणि कार्यालयात लवकर पोहचता यावे यासाठी हा पर्याय निवडला आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवर त्यांनी त्यांचा उपाय शोधला. त्यांच्या या प्रवासाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड झाला. हा व्हिडिओ 22 दशलक्षाहून अधिक वेळ पाहण्यात आला.

शिक्षक ते उद्योगपती असा प्रवास

DNA Report नुसार, फोर्ब्सच्या श्रीमंताच्या यादीत निरंजन हिरानंदानी हे 79 व्या क्रमांकावर आहेत. त्यांचा भाऊ सुरेंद्र यांच्यासोबत हिरानंदानी या समूहाची स्थापना केली. ते व्यवसायाने चार्टेड अकाऊंटेड आहेत. निरंजन हिरानंदानी यांनी सुरुवातीच्या काळात अकाऊंटिंग हा विषय शिकवला. 1981 मध्ये त्यांनी मुंबईतील कांदिवली येथे कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यांच्याकडे एकूण 12,000 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई
गणेशोत्सवात परतीच्या फेऱ्यांमध्ये 'लालपरी' मालामाल,इतक्या कोटींची कमाई.
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.