OYO : ओयोची व्यावसायिक वृद्धी, 1250 हून अधिक कॉर्पोरेट्ससोबत भागीदारी, जाणून घ्या OBC उपक्रम

कॉर्पोरेट्स कडून सर्वाधिक बुकिंग होणा-या व मागणी असणा-या शहरांमध्ये बंगलोर, हैद्राबाद, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, पुणे आणि दिल्ली या शहरांचा समावेश आहे.

OYO : ओयोची व्यावसायिक वृद्धी, 1250 हून अधिक कॉर्पोरेट्ससोबत भागीदारी, जाणून घ्या OBC उपक्रम
OVEImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 1:46 PM

मुंबई : मार्च 2022 पासून ‍ व्यावसायिक ग्राहकांसाठी (coustomer) ओयोने 1 हजार 250 हून अधिक नवीन कॉर्पोरेट्स बरोबर भागीदारी केली आहे. ओयोच्या बिझनेस ॲक्सलरेटर (OBA) उपक्रमा अंतर्गत मार्च 2022 पासून ही व्यवसायाची वृद्धी होत गेली आहे. छोटे आणि मध्यम आकाराचे व्यावसायिक, परंपरागत बिझनेस हाऊसेस आणि कंपन्या, स्टार्टअप्स, प्रवास व्यवस्थपन कंपन्यांसह चित्रपट निर्मिती संस्था यांनी बुकिंग (Booking) आणि राहण्यामध्ये मोठी आघाडी घेतली आहे. बुकिंगची सर्वाधिक मागणी असलेल्या शहरांमध्ये बंगलोर, हैद्राबाद, मुंबई (Mumbai), चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, पुणे आणि दिल्ली यांचा समावेश आहे. जून 2022 भारतातील व्यावसायिक प्रवाश्यांची संख्या वेगाने वाढत असतांनाच ओयो ने मार्च 2022 पासून 1250 हून अधिक कंपन्यां बरोबर भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. या सुधारणे मध्ये छोट्या आणि मध्यम कंपन्या, परंपरागत बिझनेस हाऊसेस आणि कंपन्या, स्टार्टअप्स, प्रवास व्यवस्थापन कंपन्यांसह चित्रपट निर्मिती संस्था यांनी मोठी झेप घेतली असून ओयोच्या महत्त्वपूर्ण ग्राहकांमध्ये या कंपन्यांचा समावेश आहे.

कॉर्पोरेट्स कडून सर्वाधिक बुकिंग होणा-या व मागणी असणा-या शहरांमध्ये बंगलोर, हैद्राबाद, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, पुणे आणि दिल्ली या शहरांचा समावेश आहे. छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे कारण या विभागातील लोकांचा अजूनही प्रत्यक्ष भेटी देऊन व्यवसाय करण्यावर भर असतो व या माध्यमातूनच ते व्यवसाय वाढवत असतात.

हे सुद्धा वाचा

ओयोच्या बिझनेस ॲक्सलरेटर डिव्हिजन कडून जानेवारी 2021 पासून आजपर्यंत 6600 हून अधिक कॉर्पोरेट्स ना सेवा देण्यात आली आहे.

एकीकडे ग्राहक ओयोच्या ॲप किंवा वेबसाईटवरून रुम अगदी आरामात बुक करू शकतात तर दुसरीकडे कॉर्पोरेट भागीदारी असलेल्या ग्राहकांना विशेष असे राहण्याचे पर्याय, वैयक्तीत कस्टमर सपोर्ट आणि त्यांच्या सिस्टम बरोबरचे एकत्रिकरण सहज करून दिले जाते.

देशांतर्गत कॉर्पोरेट प्रवास हे क्षेत्र सुध्दा ओयोच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांपैकी एक आहे, पण महामारी मुळे या सर्व गोष्टींवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊन बुकिंग मधील सातत्यामध्ये व्यत्यय येऊ लागला. ओयोने नुकतेच त्यांच्या प्रिमियम विभागातील ब्रॅन्ड कॅटेगरीज जसे टाऊनहाऊस ओक, टाऊनहाऊस, 5 बायओयो आणि 4 बाय ओयो अंतर्गत कंपन्यांना गुणवत्तेची निवड करण्याची संधी दिली आहे.

कॉर्पोरेट प्रवासातील वाढीविषयी आपले विचार मांडतांना ओयो इंडिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गुप्ता यांनी सांगितले “ महामारी नंतर प्रवासावरील निर्बंध उठल्यामुळे आता व्यावसायिक प्रवासी ही पुन्हा प्रवास करू लागले आहेत, यामुळे आता व्यावसायिक प्रवास हे नियमित आणि योजनाबध्द होऊ लागले आहेत. आमच्या अनेक कॉर्पोरेट ग्राहकांसाठी व्हर्च्युअल ‍ मिटींग हा एक थोड्या दिवसांसाठीचा आणि अनोख पर्याय होता. अशा ग्राहकांमुळे आता व्यावसायिक प्रवास ही नियमित गोष्ट बनली आहे. मिटींग्ज,इन्सेन्टिव्ह्ज आणि प्रदर्शने या गोष्टीं मुळे सुध्दा व्यावसायिक प्रवाश्यांमध्ये मोठी वाढ होतांना दिसत आहे.”

जानेवारी 2021 पासून ओयो ने 2800 हून अधिक ऑफलाईन ट्रॅव्हल एजंट्सचीही नियुक्ती केली आहे.

ग्राहक हे ओयोची निवड ही अनेक करणांसाठी करत असून यांत अनोखी इन्व्हेन्टरी आणि उपलब्धता, निवासाची गुणवत्ता, सेवांचे दर, ॲपचा सोपा वापर, पर्सनलायझेशन, विश्वास आणि ओयोच्या मंचावरील सुरक्षा, ग्राहकांना यो! चॅट, एन्ड टू एन्ड प्रोप्रायटरी कस्टमर सपोर्ट मंच यांचा समावेश आहे.

ओयो वरील कॉर्पोरेट प्रवाशांबरोबरच अन्य क्षेत्रातील प्रवासी सुध्दा नियमितपणे वाढ नोंदवत आहे. कंपनी ने ईस्टरच्या आठवड्यात भारतात 8 लाख बुकिंग्ज मिळवून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. तेंव्हापासून सलग 8 आठवडे सातत्याने बुकिंग मध्ये वाढ होत आहे. ओयो युरोप होम्स ने सुध्दा ओमायक्रॉनच्या परिणामापासून वेगाने सुधारणा केली आहे.

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.