Businessman : SIM विक्री करता-करताच नशीब उघडले, कॉलेज ड्रॉपआऊट झाला अरबपती, या तरुण उद्योजकाची यशोगाथा वाचली का..

Businessman : एका तरुणाने आयडियाची कल्पना लढवून त्याचे साम्राज्य तयार केले आहे..

Businessman : SIM विक्री करता-करताच नशीब उघडले, कॉलेज ड्रॉपआऊट झाला अरबपती, या तरुण उद्योजकाची यशोगाथा वाचली का..
एका आयडियाने इतिहास रचलाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 10:26 PM

नवी दिल्ली : तरुणाला सिम कार्ड (SIM Card) विक्री करता करता एक बिझनेस आयडिया (Business Idea) सुचली. त्याने त्यावर काम केले. स्वप्न तर पाहिलेच, पण हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी अफाट मेहनतही घेतली. त्याच्या कष्टाला फळ मिळाले. मध्यंतरी त्याच्या आयडियाला सुरुंग लागला. पण तो डगमगला नाहीच उलट फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा राखेतून उठून त्याने तीच बिझनेस आयडिया यशस्वी उद्योगात बदलली. आज तो तरुणांचा आयकॉन (Icon) बनला आहे..

Hospitality And Travel कंपनी OYO चा संस्थापक आणि संचालक रितेश अग्रवाल आज तरुणांच्या मनावर राज्य करतो. अवघ्या 23 व्या वर्षी रितेशचे नाव अरबपतींच्या यादीत समाविष्ट आहे. रितेश अग्रवाल यांची यशाची ही कारकिर्द अनेकांना प्रेरणादायी आहे.

रितेश अग्रवाल यांचा हा उद्योजक होण्याचा प्रवास थक्क करणारा आहे. मोबाईल सिम विक्री करत असताना त्यांना बिझनेसची आयडिया सुचली. रितेश मुळचा ओडिशा राज्यातील रायगाडा येथील आहे.

हे सुद्धा वाचा

नोव्हेंबर 1993 साली त्याचा जन्म झाला. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखिची होती. घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्याने एक छोटीशी दुकान सुरु केली. त्याठिकाणी तो सिम कार्डची विक्री करत होता. पण मुळातच उद्योगी गुण असल्याने त्याने नाव कमावलेच.

10 वीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर रितेश अग्रवाल दिल्लीला आला. महाविद्यालयाचा खर्च पूर्ण करण्यासाठी त्याने मोबाईल सिम कार्डची विक्री सुरु केली. पण त्याने शिक्षण काही पूर्ण केले नाही. सिम विक्रीतून उद्योगाचा श्रीगणेशा सुरु केल्याने, त्याने पुढे जाण्याचा निर्णय पक्का केला.

लोकांना बाहेरगावी हॉटेलमध्ये रुम बूक करणे त्याकाळी जिकरीचे काम होते. एकतर त्या शहरात जाऊन चौकशी करा. हॉटेल चांगली आहे की नाही याचा भरवसा नाही, उलट मनस्ताप सहन करत झोपायची व्यवस्था झाली, एवढीच धन्यता मानण्यात येत होती.

रितेशने नेमके हेच हेरले आणि लोकांना ऑनलाईन हॉटेल बुकिंग करता यावी यासाठी OREVAL STAYS या नावाची कंपनी सुरु केली. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन ग्राहकांना स्वस्ता चांगली हॉटेल बुकिंगची सुविधा त्याने सुरु केली. या कल्पनेला लोकांनी डोक्यावर घेतले.

पुढे त्याने OREVAL STAYS या कंपनीचे नाव बदलून ते OYO ROOMS असे केले. त्यानंतर देशात या कंपनीने इतिहास रचला. रितेशचे नाव भारतातील अरबपतींच्या यादीत आले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.