Biscuit : पारले-जीची साता समुद्रापार झेप, युरोपातील ही कंपनीच करणार टेक ओव्हर..
Biscuit : भारतातील लोकप्रिय ब्रँड पारले जीचा विस्तार होणार आहे..
नवी दिल्ली : भारतातील सर्वात लोकप्रिय बिस्किटांचा ब्रँड (Biscuit Brand) म्हणून पारले जी (Parle G) ओळखल्या जातो. अनेक दशकांपासून हा ब्रँड भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता या ब्रँडने साता समुद्रापार त्यांची ओळख पोहचवण्याचे ठरवले आहे. युरोपातील (Europe) सर्वात मोठा ब्रँड टेक ओव्हर करण्याच्या हालचाली पारले जीने सुरु केलेल्या आहेत.
Parle G ने युरोपातील एक मोठा उद्योग समूह खरेदीच्या हालचाली सुरु केलेल्या आहेत. हा समुह पोलंडमधील आहे. डॉ जेरार्ड (Dr Gerard) असे या समुहाचे नाव आहे. हा पोलंडमधील मोठा उद्योग समूह आहे. त्याची कोट्यवधींची उलाढाल आहे.
आघाडीची वृत्तसंस्था रायर्टसने (Reuters) याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, भारतीय बिस्किट निर्माता कंपनी पारले प्रोडक्ट्स (Parle Products) लवकरच पोलंडमधील डॉ जेरार्ड (Dr Gerard) हा समूह खरेदी करु शकतो. खासगी इक्विटी फर्म ब्रिजप्वाईंट (Bridgepoint) या डीलसाठी पारले जी सोबत चर्चा करत आहेत.
ब्रिजप्वाईंटने डॉ. जेरॉर्ड कंपनी 2013 साली खरेदी केली होती. जेरॉर्ड कंपनीची स्थापना 1993 साली झाली आहे. त्यानंतर या समुहाची मालकी ब्रिजप्वाईंटकडे गेली आहे. सध्या हा ब्रँड 200 हून अधिक उत्पादन बाजारात आणतो. यामध्ये वेगवेगळी बिस्किटे, स्नॅक्स यांचा समावेश आहे.
डॉ. जेरॉर्डची उत्पादने जगातील 30 हून अधिक देशात निर्यात होता. ब्रिजप्वाईंटने या वर्षाच्या सुरुवातीलाच या समुहातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पण रशिया-युक्रेन युद्धामुळे ही सर्व प्रक्रिया थंडावली होती. पण आता पारले जीच्या रुपाने या समुहाला पुन्हा एकदा तारणहार भेटला आहे. सर्व काही व्यवस्थित पार पडल्यास हा उद्योग समूह भारतीय मालकीच्या पारले जीच्या ताब्यात असेल.