Paytm ने भरला हुंकार, बंद सेवा पुन्हा सुरु करुन बाजारात मुसंडी मारणार

Paytm Resume Paused Products : पेटीएमने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सर्वांना दे धक्का दिला. कंपनीच्या महसूलात 25 टक्क्यांची भर पडली. कंपनीचा महसूली आकडा आता 9,978 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कंपनीत नवीन जोश संचारला आहे.

Paytm ने भरला हुंकार, बंद सेवा पुन्हा सुरु करुन बाजारात मुसंडी मारणार
पेटीएम पुन्हा सक्रिय
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 5:35 PM

मोठ्या अडचणींचा सामना केल्यानंतर पेटीएम आता पुन्हा मैदानात उतरली आहे. पेटीएमची मुळ मालक One97 Communication ने भविष्यातील विस्तार योजनेची सविस्तर माहिती दिली. कंपनीने महसुलात मोठा पल्ला गाठला. कंपनीवरील अनेक निर्बंध हटल्यानंतर कंपनी बंद केलेल्या सेवा पुन्हा सुरु करणार आहे. त्यामुळे बाजारात इतर स्पर्धकांना आता तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे.

आम्हाला मिळाली मोठी संधी

“आमच्या व्यवसायावरील मळभ त्यामुळे हटले आणि नवीन संधी आम्हाला मिळाली. ग्राहक आणि व्यावसायिक उलाढालीला त्यामुळे मजबुती आली. इतक्या कमी वेळेत हे घडले याचा खूप मोठा आनंद आहे. एनपीसीआय, सहयोगी बँक आणि आमची सहकारी टीम यांच्यामुळे हे साध्य झाले. सरकार, नियंत्रक संस्था आणि वित्तीय सेवांचा समावेश यांच्यामुळे दीर्घकालीन वाढीची आम्हाला मोठी संधी प्राप्त झाली.” असे पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी शेअरधारकांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा

“गेल्या तिमाहीत आम्हाला काही उत्पादनं आणि सेवा बंद कराव्या लागल्या होत्या. पण आता मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, या सेवा, उत्पादनं लवकरच पुन्हा ग्राहकांच्या दिमतीला असतील.” असे त्यांनी म्हटले आहे.

या फेब्रुवारीत पेटीएमला त्यांची व्यावसायिक काही उत्पादनं आणि सेवा बंद कराव्या लागल्या होत्या. तर युपीआय पेमेंटसाठी इतर काही बँकांशी सहकार्य करार करावा लागला होता. मार्च महिन्यात व्यवसायाने चांगली प्रगती केली होती. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मधील वार्षिक अहवालात म्हटले आहे की, आम्ही आगेकूच करत आहोत. आम्ही व्यापक कर्ज वितरण मॉडेलवर काम करत आहोत. त्यामाध्यमातून वसुली पण होईल.

अशी केली घौडदौड

  • या आर्थिक वर्षात पेटीएमने क्रेडिट वितरण जाळे निर्मितीवर जादा भर दिला. वितरणातही त्यांचे लक्ष क्रेडिट वितरण मॉडेलवर होते. बँका, वित्तीय संस्था आणि तंत्रज्ञानाची मदत यांच्या सहाय्याने कंपनीने या मॉडेलच्या सहाय्याने अमुलाग्र बदल केला. त्याआधारे कंपनीने कर्ज वितरणावर अधिक लक्ष केंद्रीत करता आले. कंपनीच्या मेट्रिक्समध्ये तात्पुरता व्यत्यय दिसत असला तरी आर्थिक वर्ष 2025 मधील पहिल्या तिमाहीत ग्राहक आणि व्यापारी यांचा आधार असलेल्या मेट्रिक प्रणालीत स्थिरता दिसून येईल असा कंपनीचा दावा आहे.
  • पेटीएम युपीआय सेवा ही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडरच्या (TDAP) मदतीने सुरु आहे. नोडल, एसक्रो, बीआयएनचे सेवांचा परीघ यामुळे विस्तारला आहे. कंपनी फास्टटॅग वितरण आणि भारत बिल पेमेंट सर्व्हिस यांची सेवा देत आहे. कंपनी ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँकेच्या मदतीने युपीआय युझर्सला सहज आणि सोप्यारित्या युपीआय पेमेंट सेवा देत आहे.
  • या आर्थिक वर्षात (FY24) पेटीएमने वित्तीय सेवा आणि उत्पादनांमध्ये चमकदार कामगिरी करुन दाखवली. कंपनीच्या महसूलात 25 टक्के भरीव वाढ झाली. कंपनीने कोट्यवधी पेमेंट आणि वित्तीय सेवांमध्ये भरीव कामगिरी बजावली. वार्षिक आधारावर कंपनीचा महसूलाचा आकडा आता 9,978 कोटींच्या घरात पोहचला आहे. तर युपीआय इन्सेंटिव्हमध्ये 288 कोटींची भर पडली आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षात हा आकडा 182 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2024 मध्ये 42 टक्के नफा झाला, हा आकडा 5,538 कोटी रुपयांच्या घरात पोहचला.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.