Peak Power Demand : वीजेच्या मागणीत 12 टक्क्यांनी वाढ, उद्योग क्षेत्रातून मागणी वाढली, वीजेच्या वाढत्या मागणीचे काय होणार परिणाम?

ऊर्जा मंत्रालयाच्या एका आकडेवारीनुसार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून वीजेच्या मागणीत वाढ होतेय. विशेष म्हणजे उद्योग क्षेत्रातून वीजेच्या मागणीत वाढ होत असल्यानं कोरोनानंतर पुन्हा उद्योग क्षेत्र सावरत असल्याचं दितंय. याशिवाय इतर अनेकही कारणं आहेत. ते जाणून घेऊया...

Peak Power Demand : वीजेच्या मागणीत 12 टक्क्यांनी वाढ, उद्योग क्षेत्रातून मागणी वाढली, वीजेच्या वाढत्या मागणीचे काय होणार परिणाम?
वीजपुरवठा Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 12:20 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी वीज संकटाच्या बातम्या येत होत्या, कोळसा तुटवडा असल्याच्याही अनेक बातम्या आल्या होत्या. त्यानंतर भारनियमनाविषयी बोललं गेलं. फक्त भारतातच नव्हे तर विदेशातूनही वीजेचा तुटवडा असल्याचं दिसून आलं. त्यावेळी चीनमधून (China) देखील यासंदर्भातलं एक वृत्त होतं. मात्र, यातच आता एक चांगली बातमी येतेय. ऊर्जा मंत्रालयाच्या एका आकडेवारीनुसार एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून वीजेच्या (electricity) मागणीत वाढ होतेय. विशेष म्हणजे उद्योग क्षेत्रातून वीजेच्या मागणीत (Peak Power Deman) वाढ  होत असल्यानं कोरोनानंतर पुन्हा उद्योग क्षेत्र पूर्वपदावर नव्हे तर भरभराटीकडे जात असल्याचं दितंय. याशिवाय इतर अनेकही कारणं आहेत. सध्या उन्हाळा सुरू झालाय. यातच ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या महिन्याच्या सुरुवातीला उद्योग क्षेत्रातून वीजेची मागणी वाढल्याचं समोर आलंय. कुठेतरी उद्योग क्षेत्रातील लोक याकडे आशेनं बघतायेत. वीजेच्या मागणीत झालेली वाढ, हे उद्योग क्षेत्र भरभराटीकडे आगेकुच करत असल्याचं लक्षण असल्याचं बोललं जातंय.

वीजेची मागणी वाढली

वर्षभरापूर्वी वीजेची मागणी 12 टक्क्यांनी वाढून 198.47 गीगावॅटवर पोहचली होती. ऊर्जा मंत्रालयाच्याच आणखी एका आकडेवारीनुसार, 2021 मधील एप्रिल महिन्यात आवश्यक असणाऱ्या वीजेची मागणी 177.20 गीगावॅट इतकी होती. या आकडेवारीवरुन लक्षात येईल की यंदाची वीजेची मागणी ही बारा टक्क्यांनी वाढली आहे. कोरोना आणि त्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनंतर उद्योग क्षेत्राची परिस्थिती पूर्वपदावर यायला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता बहुतेक राज्यांमधील परिस्थिती पूर्वपादवर आली आहे. यातच मागे पडलेला किंवा तोट्यात असलेला उद्योग क्षेत्र देखील पूर्वपदावर येत असल्याचं वीजेच्या मागणीवरुन समोर आलंय. सध्या तापमान वाढत असल्याचं दिसून येतंय. उत्तर भारतात देखील मोठ्या प्रमाणात उष्णता वाढतेय. यातच वीजेच्या मागणीत वाढ झाली असल्याचं दिसून येतंय.

तज्ज्ञांचं काय मत?

तज्ज्ञांचे असे म्हणने आहे की, 2022 मध्ये 198.47 गीगावॅट वीजेची मागणी ही 2019 च्या वीजेच्या मागणीच्या तुलनेत अधिक आहे. या आकड्यावरुन उद्योग क्षेत्र पुन्हा सावरत असल्याचं दिसून येतंय. मागच्या वर्षी याच काळात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली होती. उद्योग बंद होते. त्यामुळे बेरोजगारी वाढली होती, अनेक संकटांना लोकांना तोंड द्यावं लागलं. मात्र, सध्या वाढलेली वीजेची मागणी उद्योग क्षेत्रातील भरभराटीचे संकेत देत आहे. याचा परिणाम रोजगार वाढण्यातही होऊ शकतो. विशेष म्हणजे उद्योग क्षेत्रातून वीजेच्या मागणीत वाढ होत असल्यानं कोरोनानंतर पुन्हा उद्योग क्षेत्र पूर्वपदावर नव्हे तर भरभराटीकडे जात असल्याचं दितंय.

इतर बातम्या

sharad pawar on kashmir files: गुजरातची हिंसा यापेक्षा भयंकर होती, रेल्वेचा डबा पेटवला, शेकडो मेले; शरद पवारांनी दाखवला भाजपला आरसा

Nagpur | Meteor Shower or Satellite ? : 10 फूट व्यासाची चक्राकार वस्तू पडली, नेमकं काय याचा अभ्यास सुरू, विजय वडेट्टीवार यांची माहिती

Honda CBR 1000 RR-R Price Cut: होंडाची सुपरबाईक 10 लाखांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.