AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Penny Stock : 35 पैशांच्या स्टॉकने केले मालामाल, लखपती झाले करोडपती

Penny Stock : या कंपनीने मल्टिबॅगर परतावा दिला आहे. कधीकाळी 35 पैशांचा स्टॉकने ही कमाल करुन दाखवली आहे. आता पण स्टॉक महागडा नाही. तो अजूनही 40 रुपयांच्या घरात आहे. पण या शेअरने 1 लाख रुपयांचे 1 कोटी रुपये केले आहे. या शेअरने जोरदार परतावा दिल्याने गुंतवणूकदारांच्या त्यावर उड्या पडल्या आहेत. कोणता आहे हा स्टॉक?

Penny Stock : 35 पैशांच्या स्टॉकने केले मालामाल, लखपती झाले करोडपती
| Updated on: Oct 06, 2023 | 7:37 PM
Share

नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात (Share Market) उलथापालथ सुरुच आहे. या कंपनीने मल्टिबॅगर परतावा दिला आहे. कधीकाळी हा स्टॉक अवघ्या 35 पैशांना मिळत होता. तो आता 37 रुपयांवर जाऊन पोहचला आहे. बाजारात अनेक स्टॉक्स कमाई करुन देतात. पण योग्य स्टॉकची निवड करणे आणि गुंतवणूकीचा आढावा घेणे आवश्यक असते. काही दिग्गज कंपन्यांपेक्षा स्मॉल कॅप फंड चांगली कामगिरी करत असल्याचे दिसून येते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना त्यांच्या कौशल्याचा मोठा फायदा होतो. त्यांना मल्टिबॅगर परतावा मिळतो. या स्टॉकने पण गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. त्यांना जोरदार परतावा दिला आहे. कोणता आहे हा स्टॉक?

एका वर्षात जोरदार रिटर्न

या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. या स्मॉल कॅप पेनी स्टॉकने एकाच वर्षात मोठा परतावा दिला. या दरम्यान या स्टॉकने 101.90 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर दोन वर्षांचा विचार करता या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 10471.43 टक्क्यांचा परतावा दिला आहे. ही अद्भूत उसळी आहे. ही तर रॉकेट भरारी आहे. हा स्टॉक 35 पैशांहून थेट 37 रुपयांवर जाऊन पोहचला आहे. शुक्रवारी हा शेअर 37 रुपयांवर बंद झाला.

कोणती आहे ही कंपनी

राज रेयॉन इंडस्ट्रीज (Raj Rayon Industry) असे या शेअरचे नाव आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, जवळपास 15 असे स्टॉक आहेत. ज्यांची किंमत 50 रुपयांच्या आत आहे. पण त्यांनी 1,000 टक्क्यांचा परतावा दिला आहे. हा परतावा गेल्या पाच वर्षांतील आहे. राज रेयॉन इंडस्ट्रीज त्यातीलच एक आहे. या कंपनीचा स्टॉक 7 सप्टेंबर 2018 रोजी 0.19 रुपयांवर होता. तो आज थेट 37 रुपयांवर जाऊन पोहचला आहे.

ही कंपनी पण आघाडीवर

मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोलकेमिकल्स लिमिटेड (MRPL) हा शेअर गेल्या तीन वर्षांत 283% वधारला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. बिर्ला समहू आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांचा हा संयुक्त उद्योग आहे.कंपनीचे मुख्य कार्य कच्चा तेलाचा शोध घेणे, पेट्रोकेमिकल्स, विमानाच्या इंधनाचा व्यापार आणि रिटेल आऊटलेटसह इतर पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन करणे आणि त्यांचे वितरण करणे हा आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.