Penny Stock | या पेनी शेअरने केली कमाल, 87 पैशांच्या शेअरमुळे गुंतवणूकदार करोडपती

Penny Stock | या बांधकाम कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बम्पर रिटर्न दिला. या कंपनीच्या शेअरने दीर्घकालीन आणि अल्पावधी शेअरधारकांना मोठा परतावा दिला आहे. ज्यांनी 2001 मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यांना कोट्यवधींचा रिटर्न मिळाला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना 22 वर्षांत करोडपती केले आहे.

Penny Stock | या पेनी शेअरने केली कमाल, 87 पैशांच्या शेअरमुळे गुंतवणूकदार करोडपती
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 4:33 PM

नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात असे काही स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले आहे. अशाच एका छोटुराम शेअरने गुंतवणूकदारांचे वारे-न्यारे केले आहे. बाजारात घसरण होत असताना, बाजारात नुकसानीचे सत्र असताना पण या शेअरने छप्परफाड रिटर्न दिला आहे. शेअरधारकांना या शेअरने मालामाल केले आहे. बांधकाम क्षेत्राशी हा शेअर संबंधित आहे. 2001 मध्ये ज्या गुंतवणूकदारांना या शेअरमध्ये गुंतवणूक केली. त्यांना या 22 वर्षांत जोरदार परतावा मिळाला. या शेअरने त्यांना करोडपती केले आहे. कोणती आहे ही कंपनी?

सातत्याने दिला बम्पर रिटर्न

शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण सुरु आहे. या तीन दिवसात तर बाजारात पडझडीचे सत्र होते. पण या पडत्या काळात ही या शेअरने बाजारात तेजी दाखवली. या कंपनीने पण प्रवाहाच्या उलट जोरदार कमाई करुन दिली. या कंपनीने लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म या दोन्हीत पैशांचा पाऊस पाडला. या कंपनीने पहिल्यांदाच मोठा फायदा मिळवून दिला असे नाही, यापूर्वी पण कंपनीने अशी कामगिरी बजावली आहे.

हे सुद्धा वाचा

करोडपती झाले गुंतवणूकदार

या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे आज करोडपती झाले आहेत. 5 ऑक्टोबर 2001 रोजी या कंपनीचा शेअर अवघ्या 87 पैशांना होता. या शुक्रवारी कंपनीचा शेअर 155 रुपयांवर व्यापार करत होता. 2001 मध्ये ज्यांनी एक लाख गुंतवले असते ते आज करोडपती असते. एक वर्षांपूर्वी ज्यांनी 1 लाख रुपये गुंतवले असते त्यांना 2 लाख 16 हजार रुपयांचा परतावा मिळाला असता. सहा महिन्यात एक लाख रुपयांचे 1.36 लाख रुपये झाले असते. तर ज्यांनी 5 वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती ती रक्कम आज 2 लाख 31 हजार रुपये झाली असती.

कोणती आहे कंपनी

नागार्जुन कंस्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (NCC Share) असे या कंपनीचे नाव आहे. या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये या स्टॉकने गुंतवणूकदारांना 2,744 टक्क्यांचा बंपर परतावा दिला आहे. हा शेअर अजून मोठी उसळी घेईल, असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटत आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.