Gold Rate Bill : गेले कुठे ते दिवस, अवघ्या 10 रुपयांत मिळायचे इतके ग्रॅम सोने, जुने बिल पाहून गहिवरले ग्राहक

Gold Rate Bill : अवघ्या 10 रुपयांत मिळायचे एवढे सोने, बिल पाहून तुम्हाला ही बसेल सूखद धक्का

Gold Rate Bill : गेले कुठे ते दिवस, अवघ्या 10 रुपयांत मिळायचे इतके ग्रॅम सोने, जुने बिल पाहून गहिवरले ग्राहक
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 4:55 PM

नवी दिल्ली : सोन्याच्या भाव (Gold Price Today) आज गगनाला पोहचले आहे. 10-12 वर्षांपूर्वी सोन्याचा भाव सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात होते. त्यानंतर सोन्याने जबरदस्त झेप घेतली. सोन्याचे भाव झपाझप वाढले. सोन्याचे भाव 50 हजारांच्या घरात पोहचले. त्यानंतर सोन्याच्या भावाने 60,000 रुपयांकडे आगेकूच केली आहे. लवकरच सोन्याचा भाव 60,000 रुपये होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पण तुम्हाला एक बिल (Bill) हैराण करणार आहे. हे सोन्याच्या खरेदीचे हे बिल सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे. 1959 साली सोन्याच्या एक तोळ्याची किंमत 113 रुपये होती. आज सोन्याचा भाव 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे बिल 3 मार्च 1959 रोजीचे आहे. जवळपास 64 वर्षांपूर्वी देशात सोन्याची किंमत 113 रुपये तोळा रुपये आहे. हे बिल महाराष्ट्रातील एका सराफा दुकानातील आहे. बिलावर दुकानाचे नाव छापले आहे. मेसर्स वामन निंबाजी अष्टेकर आणि कंपनी असे या सराफा दुकानाचे नाव आहे.

सोने खरेदीदाराचे नाव शिवलिंग आत्माराम असे आहे. बिलानुसार, आत्माराम यांनी सोने आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली होती. बिलात या सर्वांची एकूण किंमत 909 रुपये आहे. एक तोळा 11.66 ग्रॅमच्या बरोबर असते. तेव्हा एक ग्रॅम सोन्याचा भाव 10 रुपये होता. आज त्याची किंमत 5,600 रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

त्याकाळी सोन्याची स्वस्ताई होती, असा दावा काही युझर्सने केला आहे. पण त्याकाळीही महागाई होतीच. सोन्याची खरेदी सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर होती. पण आतासारखे सोने महाग नक्कीच नव्हते. आता सोन्याचा भाव कडाडले आहेत.

त्याकाळचे 100 रुपये आजच्या 50,000 रुपये असल्याचा दावा एका युझरने केला आहे. सध्या संपूर्ण जगात महागाईचा बोलबोला आहे. अशावेळी कमाई पोट भरण्यातच खर्ची पडत आहे. बचतीसाठीही काहीजवळ पैसा उरत नाही.

काही दिवसांपूर्वी श्रीलंकेची वाईट परिस्थिती सर्व जगाने पाहिली. आता पाकिस्तान याच मार्गावर दिसत आहे. पाकिस्तानी नागरिकांना गव्हाच्या पीठासाठी संघर्ष करावा लागत आहे. एक किलो पीठासाठी 150 रुपये मोजावे लागत आहे. किरकोळ महागाई भडकली आहे.

त्यामुळेच हे जुने बिल पाहून अनेक ग्राहकांना गहिवरुन आले आहे. अनेक जण त्याकाळी सोन्यात गुंतवणूक करत होते. बचतीतील काही रक्कम सोने खरेदीसाठी उपयोगात येत होती. पण सध्या सोन्याचा दर प्रचंड वाढले आहेत. लग्नसराईत भाव वधारल्याने सर्वांनाच घोर लागला आहे.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....