Pervez Musharraf : परवेज मुशर्रफ यांचा कोट्यवधींचा प्रवास, एवढी जमा केली संपत्ती
Pervez Musharraf : पाकिस्तानचे पूर्व राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ लष्कर प्रमुख पदी होते. त्यांनी हुकूमशाहीच्या जोरावर कोट्यवधींची संपत्ती कमावली. त्यांनी इतकी संपत्ती कमावली आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पूर्व राष्ट्रपती परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे दीर्घ आजारपणामुळे निधन झाले. दुबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक वर्षे पाकिस्तानची सत्ता त्यांच्या हातात होती. हुकूमशाहीच्या जोरावर त्यांनी कोट्यवधींची माया जमा केली. ही संपत्ती त्यांनी बाहेरील देशात पाठवली, परदेशातही त्यांनी मोठी संपत्ती जमा केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे मुशर्रफ यांनी महत्वाच्या पदावर असतानाच माया जमाविल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आले आहेत. परवेज मुशर्रफ यांनी निवडणूक आयागोकडे शपथपत्र दाखल केले होते. त्यात त्यांच्याकडे एकूण 62 कोटी पाकिस्तनी रुपयांची संपत्ती (Pervez musharraf property) असल्याचा दावा करण्यात आला होता. पनामा पेपर कांडमध्ये ही त्यांचे नाव समोर आले होते. लंडन आणि दुबईतही त्यांची मालमत्ता असल्याचा दावा करण्यात येतो.
पाकिस्तानमध्ये परवेज मुशर्रफ यांची अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचा दावा करण्यात येतो. कराचीमध्ये त्यांचे 50 लाख रुपयांचे घर आहे. कराचीतील डिफेंस हाऊसिंग अॅथॉरिटी परिसरात 15 लाख रुपयांचा भूखंड आहे. खायबान ए फैजल फेसमध्ये जवळपास 15 लाख रुपयांचा प्लॉट आहे.
पाकिस्तानमधील प्रमुख शहरातच नाही तर ग्रामीण भागातही मुशर्रफ यांनी बेनामी माया जमाविल्याचा आरोप करण्यात येतो. त्यांनी समर्थकांच्या नावे संपत्ती केल्याचा दावा विरोधक करतात. लाहोरमध्ये त्यांचा 60 लाख रुपयांचा भूखंड आहे. इस्लामाबादमध्ये 7.5 कोटींचा भूखंड आणि 60 लाखांचे फार्म हाऊस असल्याचा दावा आहे.
पाकिस्तानशिवाय मुशर्रफ यांचे लंडन आणि दुबई या शहरातही कोट्यवधींची संपत्ती आहे. लंडनमध्ये आलिशान हाईड पार्क परिसरात त्यांनी फ्लॅट खरेदी केला होता. त्याची किंमत जवळपास 20 कोटी रुपये होती. दुबईतही त्यांनी 20 कोटींचा फ्लॅट खरेदी केला होता.
FIA ने मुशर्रफ यांच्या जवळपास अर्ध्याहून अधिक बँक खात्याचा तपशील न्यायालयात सादर केला होता. यामध्ये पाकिस्तानमधील बँकां व्यतिरिक्त त्यांचे लंडनमधील बँकांमध्ये पण खाते असल्याचे समोर आले होते. न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, मुशर्रफ यांच्या परदेशी खात्यात 2 कोटी डॉलर जमा होते. तर पाकिस्तानच्या बँक खात्यात 12 लाख 50 हजार रुपये जमा होते.
पाकिस्तानमधील एका पत्रकाराने 2020 मध्ये मशुरर्फ यांच्या खात्याविषयी गौप्यस्फोट केला होता. त्यानुसार, परवेज मुशर्रफ यांना निवृत्तीनंतर दोन कोटी रुपये देण्यात आले होते. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार, लष्काराने मुशर्रफ यांना जे घर आणि संपत्ती दिली होती. ती त्यांनी विक्री केली नव्हती.